18 जुन रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांची कायदा व सुव्यवस्थेविषयी मुलाखतीचा भाग दुसरा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

18 जुन रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांची कायदा व सुव्यवस्थेविषयी मुलाखतीचा भाग दुसरा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर- 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा पोलीस विभाग सज्ज असून पोलीस विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था विषयीची जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची मुलाखतीचा भाग दुसरा 18 जून रोजी सकाळी 7:45 वाजता आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून प्रसारित होणार आहे.

कोरोना विषयी जनजागृती संदर्भात नागरिकांना कोरोनाविषाणू माहिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनेविषयी माहिती व्हावी यासाठी आत्मभान अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपायोजना याविषयीची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी प्रशासनातील अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत.

जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूरद्वारे हा कार्यक्रम निर्मित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस प्रशासनाची तयारी याविषयीची मुलाखत आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून ऐकावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.