चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली जवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 4 च्या सुमारास घडली. अपघातग्रस्त इर्टिगा गाडीचा टायर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नागपूर वरून चंद्रपूरकडे इर्टिगा गाडीतून काही जण प्रवास करत होते. मात्र गाडी अतिशय वेगात असल्याने चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगलीजवळ या गाडीचा टायर फुटला. त्यानंतर ही गाडी तब्बल 150 फूट घासत पुढे निघून गेली. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत.
वृत्त लिहेपर्यंत मृतकांची ओळख पटली नव्हती.