लॉकडाऊन तणाव? : चंद्रपुरात सलून व्यावसायिकाची आत्महत्या ! आज 15 जून सकाळी 7:30 वाजता घटना उघडकीस #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लॉकडाऊन तणाव? : चंद्रपुरात सलून व्यावसायिकाची आत्महत्या ! आज 15 जून सकाळी 7:30 वाजता घटना उघडकीस #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

ऊर्जानगर येथील समता नगर येथे एका सलून व्यावसायिकाने आत्महत्या केली. स्वप्नील चौधरी २७ असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. शेजारी राहणाऱ्या युवकाने आज (१५ जून) सकाळी ७.३० वाजता स्वप्नील अजून उठला नाही म्हणत आवाज दिला. 

परंतु काहीही प्रतिसाद मिळत नाही आहे हे बघत शेजारील लोक एकत्रित झाले आणि दार उघडून बघितले असता स्वप्नील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. लगेच पोलिसांना कळविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील च्या आई-वडीलांना अगोदरच देवाज्ञा झालेली आहे तो घरी एकटाच राहत होता. 

कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन झाल्यामुळे सलून व्यवसायाला झळ पाहोचली आहे. उपासमार होत असल्याचाने तर या सलून व्यावसायिकांने आत्महत्या केली नसेल ना असे अशी चर्चा परिसरात सुरु आहे.