दिनांक २१/०६/२०२० रोजी शेगाव पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा वहानगाव वा. चिमुर येथील कमलसिंग परी यांचे घरी त्यांचे नातेवाईक जगदिपसिंग छोट्सिंग भोंड (वय -३८ वर्ष ) रा. पळसगाव, सिंदेवाही बऱ्याच दिवसापासुन राहत असुन त्यांचे जवळ एक १२ बोअर बंदुक आहे. अशी माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी सदर इसमाच्या घरी छापा टाकला.
सदर कार्यवाहीत जगदिपसिंग भोडा भगत मिळून आला सदर इसमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांचे घरी विना परवाना असलेली एक १२ बोअर बंदुक किं, ५,०००/-रु. मी मिळुन आली. सदर बंदुक त्यात घेवून आरोपी नामे जगदिपसिंग बोटुसिंग भोंड वय ३८ वर्ष रा. पळसगाव, सिंदेवाही यास अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन शेगाव येथे अप.क.२०५/२०२० कलम सस अधिनियम २५(३) सहकलम १८८ भावि अन्वये नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शेगाव श्री. सुधिर बोरकुटे पाणे नेतृत्वात पोउपनि, प्रविण जाधव. सफो सागर, चौधरी, पोडवा, आमणे. पोशि विठ्ठल.प्रदिप, प्रविण, सचिन, मपोशि. निकीता, भाग्यश्री यांनी पार पाडली.