कोरोना विस्फोट : चंद्रपुरात नवे 11 कोरोनाबधित : रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात एंट्री, ऍक्टिव्ह 17 तर एकूण रुग्ण 39 #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना विस्फोट : चंद्रपुरात नवे 11 कोरोनाबधित : रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात एंट्री, ऍक्टिव्ह 17 तर एकूण रुग्ण 39 #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर – 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रविवारी दिनांक ७ जून रोजी एकाच दिवशी ११ कोरोना पॉझिटीव्ह आढळले. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ३९ झाली आहे. 

◾️यामध्ये मुंबईवरून आलेला शास्त्री नगर चंद्रपूर येथील ३१ वर्षाच्या पुरुष , 
◾️नवी दिल्लीवरून गडचांदूर येथील २७ वर्षाचा व्यक्ती, 
◾️जळगाववरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील ३६ वर्षाचा व्यक्ती, 
◾️यवतमाळ वरून आलेला नागभीड तालुक्यातील पूनघाडा रिठ या गावचा ३६ वर्षीय व्यक्ती, 
◾️ओडीसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावचा चाळीस वर्षीय पुरुष, 
◾️तसेच यवतमाळ येथून आलेला नागभिड शहरातील ४५ वर्षाचा पुरुष, 
◾️तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्ती सह ब्रह्मपुरी येथील covid-19 केअर सेंटर मधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या एकूण पाच व्यक्तींचा समावेश आहे.

यापैकी अडयाळ टेकडी येथील संपर्कातील दोघांना वगळता अन्य ३ नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला ४३ वर्षाचा व २७ वर्षाचा पुरूष आहे.तर गुजरात मधून आलेला पुंड सावली येथील एक व्यक्ती आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ३९ झाले आहेत.आतापर्यत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ३९ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता १७ आहे.