तब्बल 100 दिवसानंतर संतोष वाटेकर हत्ये प्रकरणी एक संशयीत ताब्यात : वणी येथील एटीएम कॅश चोरी प्रकरण : गडचांदूर पोलीस ठाणे हद्दीत सापडला होता मृतदेह #gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तब्बल 100 दिवसानंतर संतोष वाटेकर हत्ये प्रकरणी एक संशयीत ताब्यात : वणी येथील एटीएम कॅश चोरी प्रकरण : गडचांदूर पोलीस ठाणे हद्दीत सापडला होता मृतदेह #gadchandur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -

वणी स्टेट बॅकेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम करीत असलेल्या वणी येथील तरुणाचा चंद्रपुर जिल्हयातील गडचांदुर परिसरातील जंगलात दि. 29 फेब्रुवारीला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला होता. 

गडचांदुर पोलीसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास गुन्हे शोध पथकाकडे देण्यात आला होता. तब्बल शंभर दिवसांनी पोलीसांनी दि. 17 जुन ला वणी येथुन एका बिअर बार मालकाला संशयीत म्हणुन ताब्यात घेतले आहे.

विठठलवाडी येथील रहिवाशी असलेला मृतक संतोष वाटेकर हा मागील अनेक वर्षापासुन ईपीएस लाॅजी कॅश सोलुशन प्रा. लिमिटेड नागपूर या कंपनीच्या माध्यमातुन स्टेट बॅकेच्या एटीएम मध्ये रक्कम भरण्याचे काम करीत होता. दि. 20 फेब्रुवारीला स्टेट बॅकेतुन रक्कम घेवुन तो एटीएम मध्ये भरण्याकरीता निघाला होता तेव्हा पासुनच तो बेपत्ता झाला.

वणी येथे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. दि. 29 फेब्रुवारीला चंद्रपुर जिल्हयातील गडचांदुर परिसरातील जंगलात त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला होता.

याप्रकरणी गडचांदुर पोलीसांनी खुनाचा गुन्हा नोंद करुन तपास चंद्रपुर गुन्हे शोध पथकाकडे सोपवला असता या पथकाने वणी येथे तब्बल दोन दिवस तळ ठोकून अनेकांची चैकशी केली मात्र कोणताही सुगावा लागत नसल्याने तपास थंड बस्त्यात होता. दि. 17 जुन चंद्रपुर येथील स्थानिक गुन्हे शोध पथकाने निळापुर मार्गावर असलेल्या बार मालक लखन लक्ष्मण नक्षीने संशयीत म्हणुन ताब्यात घेतले आहे. त्याला गडचांदुर पोलीसांनी कोरपना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.