जिल्ह्याधिकाऱ्यांचा फोन-इन कार्यक्रम 10 जूनला, दूरध्वनी वरून साधा संपर्क #diochandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्याधिकाऱ्यांचा फोन-इन कार्यक्रम 10 जूनला, दूरध्वनी वरून साधा संपर्क #diochandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोरोना जनजागृतीसाठी आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या आत्मभान अभियानांतर्गत आकाशवाणी केंद्रावर फोन-इन कार्यक्रम 13 जून पासून सुरू होणार आहे. 13 जून शनिवार रोजी प्रसारित होणाऱ्या कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जनजागृती संदर्भात नवनवीन उपक्रम राबवित आहे. नागरिकांमध्ये कोरोना विषाणू विषयी सविस्तर माहिती व्हावी, दैनंदिन जीवनात कशी काळजी घ्यावी, कोरोना नियंत्रण होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत कोणते उपाय योजना राबविल्या जात आहे. याविषयीचे काही प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण थेट फोन करून हे प्रश्न विचारू शकता.

या फोन-इन कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण दिनांक 10 जून बुधवार रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत जास्तीत जास्त 07172-254634 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपल्या मनातील प्रश्न विचारू शकता.

कोरोना आणि प्रशासनाची तयारी याविषयी नागरिकांमधील असलेल्या प्रश्नांच, शंकांच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार निरसन करतील.तेव्हा अवश्य फोन करा आणि फोन-इन या कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.