सिलेंडर चा स्फोट होऊन भीषण आग : अंदाजे 10 लाखाचे नुकसान : प्रशासनाची मदत अजूनही पोहोचलीच नाही : गावकऱ्यांच्या प्रचंड मेहनतीने गाव पेटता वाचला #cylender-blast - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिलेंडर चा स्फोट होऊन भीषण आग : अंदाजे 10 लाखाचे नुकसान : प्रशासनाची मदत अजूनही पोहोचलीच नाही : गावकऱ्यांच्या प्रचंड मेहनतीने गाव पेटता वाचला #cylender-blast

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती -

जिवती तालुक्यातील 5 किलोमीटर वरील कुंभेझरी या गावात नारायण पवार यांचे घरी घरगुती गॅस सिलेंडर चा स्पोट होऊन घराला भीषण आग लागली.या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. आग लागल्याची प्रशासनाला माहिती देऊनही रात्रभरात कोणतीही मदत पोहोचली नसून गावकऱ्यांनी प्रचंड मेहनतीतून आगीवर नियंत्रण मिळवत संपूर्ण गाव पेटण्याचा धोका टळला. 

पवार यांच्या घरगुती सिलेंडर चा अचानक लिकेज आवाज येऊन स्फोट घेतला असता घरातील सर्व मंडळींनी समयसूचकता दाखवत बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही पवार यांच्या घरासमेत शेजारील 3-4 घरे सुद्धा या आगीत प्रभावित होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. 

शेतीचे काम चालू करण्यासाठी संपूर्ण सामानांची खरेदी बी-बियांन्या सहित एक ऑटो व मोटरसायकल मिळून अंदाजे 6 लाखाच्या वर नुकसान झाले आहे.सोबतच घराचा पूर्ण ढाचा जळून खाक झाल्याने अंदाजे 10 लाखाच्या वर नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

संपूर्ण घर जळून खाक झाले तरीही गावकऱ्यांचे आग विझवण्याचे काम सुरूच होते,काही वेळातच गावातील सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आग विझवण्यात यश आले.