काल दिनांक 7 जून 2020 ला भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी ,केंद्रीय कार्यालय घुगूस येथे ,अखिल भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे महामंत्री मा.सुधीर घुरडे यांचा संघटनात्मक दौरा सम्पन्न झाला,त्यावेळी त्यांनी उपसस्थित कार्यकर्ता व पत्रकार परिषदेला संबोधित केले.
वर्तमान सरकारने कोळसा क्षेत्राच्या व्यावसायिकीकरन तसेच प्रचलित श्रम कानून मध्ये बदलावं व कामगार विरोधी निती,या निर्णयाचा भारतीय मजदूर संघ पूर्ण ताकतीने विरोध करेल.
या आंदोलन कार्यक्रमाच्या महत्वाच्या टप्यात देशातील सार्वजनिक कोल क्षेत्रातील महाप्रबंधक कार्यालया समोर दिनांक 10 जून रोज बुधवार ला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत धरणा प्रदर्शन करण्यात येईल व 11 जून 2020 ला काळी फिती लावून "विरोध दिवस" पाळण्यात येईल. एवढ्यावर सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
या आंदोलनाला देशातील सर्वच कोल कामगार संघटनाचे सहकार्य लाभणार आहे असे यावेळी सुधीर घुरडे यांनी कळविले आहे.