भयंकर निष्काळजी : 10 ˈक्वॉरन्टीन् व्यक्तींना नेले एकाच रुग्णवाहिकेतून : दोन पॉसिटीव्ह निघाल्याने बाकी 8 भयभीत : आरोग्यविभागाचा केवढा हा निष्काळजीपणा !#10 quarantine persons were transported in a single ambulance, 2 found positive - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भयंकर निष्काळजी : 10 ˈक्वॉरन्टीन् व्यक्तींना नेले एकाच रुग्णवाहिकेतून : दोन पॉसिटीव्ह निघाल्याने बाकी 8 भयभीत : आरोग्यविभागाचा केवढा हा निष्काळजीपणा !#10 quarantine persons were transported in a single ambulance, 2 found positive

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रावती 

भद्रावती शहरात बाहेरून आलेल्यांना विविध ठिकाणी  ˈक्वॉरन्टीन् करण्यात आले असून यातील दहा जणांना आरोग्य विभागाने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नमुने  घेण्यासाठी एकाच रुग्णवाहिकेत एकत्र कोंबून नेण्याची प्रक्रिया केल्याने यातील दोन जण कोरोना पॉझिटिव निघताच आम्हाला तर याचा संसर्ग झाला नाही ना या भीतीने इतर आठ जणांसह त्यांचे पालक भयभीत झाले आहे. 

झालेला हा प्रकार उघडकीस येताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून पुन्हा त्यांचे  घेऊन चाचणी करणार असल्याची बतावणी करण्यात येत आहे.

कोरोना रोगाचा संसर्ग लक्षात घेता तहसील विभाग ,नगर परिषद विभाग ,आरोग्य विभाग यांचेकडून कडक सूचना नागरिकांना देण्यात येत आहे. सुरक्षित अंतर ठेवा, चेहऱ्यावर मास्क लावा, वारंवार हात धुवा , बाहेरगावाहून आलेल्यांच्या संपर्कात राहू नका अशा सूचना देण्यात येत असल्या तरी प्रत्यक्ष हे विभाग खबरदारी घेताना दिसून येत नाही आहे. या आठवड्या भरापासून विविध राज्यातून आलेल्यांना भद्रावती विविध भागात कोरोन टाईनं करण्यात आले आहे. 

यातिल आदिवासी वस्तीगृह व सनी पॉईंट येथील दहा जणांना दिनांक 25 तारखेला कोरोना चे तपासणी नमुने  घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले होते या दाही जणांना एकाच रुग्णवाहिकेत कोंबून नेण्याची व आणण्याची प्रक्रिया करण्यात आली यात आरोग्य विभागा कडून सुरक्षित अंतर तसेच इतर नियमाचे पालन करण्यात आले नाही. 

आता या समूहातील दोन जणांचे पॉझिटिव नमुने आल्याने यामध्ये आपल्याला तर संसर्ग झाला नाही ना असे भीतीचे वातावरण पसरले आहे.

या गंभीर प्रकाराबाबत वैद्यकीय अधिकारी यांना सूचना केल्या गेल्या आहे . यामध्ये एकत्र आलेल्यांचा पुन्हा स्लॅब घेऊन चाचणी करण्यात येईल व योग्य ती खबरदारी घेण्यात येईल महेश शितोळे तहसीलदार भद्रावती 

रुग्णवाहिकेत एकत्र आलेल्यांपैकी दोन पॉझिटिव्ह व बाकी निगेटिव्ह निघाले आहे तरीसुद्धा त्यांना ˈक्वॉरन्टीन् करण्यात आले असून त्यांचे पुन्हा  घेण्यात येणार आहेत -डॉक्टर आनंद किनाके वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय भद्रावती.