काँग्रेस नगरसेविका " कलमती यादव " अपात्र : 10 महिन्याचे मानधन सुद्धा वापस घेण्याची प्रक्रिया सुरु : इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्रमांक 6 मध्ये फेरनिवडणूक होणार #mncchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काँग्रेस नगरसेविका " कलमती यादव " अपात्र : 10 महिन्याचे मानधन सुद्धा वापस घेण्याची प्रक्रिया सुरु : इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्रमांक 6 मध्ये फेरनिवडणूक होणार #mncchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी -

चंद्रपूर महानगरपालिकेतील इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्रमांक 6 मधील नगरसेविका कलमती रामगोपाल यादव यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. 

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी 23 जून रोजी या संबंधीचे आदेश काढले आहे. यादव यांच्या अपात्रतेमुळे आता पुन्हा एकदा या प्रभागात निवडणूक होणार आहे. सन 2017 मध्ये महानगरपालिकेच्या झालेल्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभागातून बहुजन समाज पक्षाच्या रंजना यादव जिंकून आल्या होत्या. 

ही जागा ओबिसी महिला प्रभागासाठी राखीव होती. मात्र, त्यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द ठरविण्यात आले. त्यानंतर 23 जून 2019 रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कलमती यादव विजयी झाल्या. मात्र, त्यांनीसुद्धा 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. 

त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. कलमती यादव यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यामुळे जवळपास 10 महिने त्यांना दिलेले मानधनसुद्धा वापस घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रभागात सहा महिन्यानंतर पुन्हा निवडणूक घेतली जाणार आहे.