चंद्रपूर शहरालगत दाताळा रोड वरील म्हाडा कॉलोनी येथे 10 जूनच्या रात्री 10.30 ते 11 वाजताच्या दरम्यान काही युवकांनी अचानक चाकूने हल्ला चढवीत तेथील रहिवासी निलेश गोटे या युवकाची त्याची हत्या केली.
निलेशवर चाकूने हल्ला होत असताना वडील यांनी हल्ला करणाऱ्या युवकाचा चेहरा बघितला. मृतक निलेशने श्वास सोडण्याआधी वडीलाला हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव सांगितले अंकित देहारकर यांनी व त्याच्या मित्रांनी हल्ला केला, असे बयान निलेश ने दिले.
हल्ला करणारे 3 ते 4 युवक असल्याची माहिती मृतक निलेशच्या वडीलाने दिली. नेमका वाद कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट आहे. निलेशच्या अंगावर चाकूचे घाव होते, गळ्याला चाकूचा घाव सुद्धा होता. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व तपास सुरू आहे.