पैनगंगा नदीपात्रालगत महिलेचा मृतदेह : चंद्रपूर -यवतमाळ सीमेलगत खळबळ #woman-found-dead- - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पैनगंगा नदीपात्रालगत महिलेचा मृतदेह : चंद्रपूर -यवतमाळ सीमेलगत खळबळ #woman-found-dead-

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -कोरपना तालुक्यातील सांगोडा गावाला लागून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रालगतच्या शेतात एका वृद्ध महिलेचा मृतदेह काल दुपारच्या सुमारास आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. 

सविस्तर माहिती नुसार सांगोडा गावालगत वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रता एका वयस्क महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती होताच पोलीस प्रशासनाला माहिती दिली असता प्रत्यक्ष घटनास्थळी बघितले असता मृतदेह पैनगंगा नदी अलीकडच्या शेतात पडून होता. हे ठिकाण परमडोह (चिखली )तालुका वणी, जिल्हा यवतमाळ पोलीस च्या शिरपूर ठाणे च्या हद्दीत येत असल्याने घटना पंचनामा त्यांनी केला असून  प्राथमिक पाहणीवरून सदर महिला वेडसर असल्याचे निदर्शनास आले असून वय अंदाजित 55-60असावे.मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना पाठवून शिरपूर ठाणे अधिक तपास करीत आहेत. 

दरम्यान 2दिवसांपूर्वी सदर महिला पैनगंगा नदी पात्रालगतच्या अंतरगाव, सांगोडा गावात भ्रमंती करताना काही नागरिकांना आढळली असल्याची व भूक-पाण्यामुळे तिचा प्राण गेल्याची चर्चा आहे.