तुफान आलंया...... !!! #windstrom-at-चंद्रपूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तुफान आलंया...... !!! #windstrom-at-चंद्रपूर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

काल दिनांक 6 मे दुपारी अचानक चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात तूफान वादळी पावसासहित गारांची अकाली वृष्टी झाली. जिल्ह्यातील अनेक तालुके राजुरा, कोरपना, चिमूर, बल्लारपूर आदी तालुक्यात सैरभैर वाऱ्यासहित अनेक मोठमोठी झाडें गावातील झाडे, विजेचे खांब, पब्लिसिटी फ्लेक्स बॅनर चे खांब उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी असे वृक्ष कोसळल्याचे दिसून आले.

विजेचे खांब व विद्युत प्रवाहित तारांवर झाडें पडल्याने तारा तुटून अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला. गेल्या 4-5दिवसापासून अचानक वाढलेला तापमानाचा पारा व काल दुपारी क्षणात बदलेल्या वातावरनाच्या अनपेक्षित सैराट बदलाने बऱ्याच ठिकाणी जीवित हानी सोबतच वाहतूक सुद्धा ठप्प पडली. 


चिमूर तालुक्यात भिसी येथे राईसमिलची भिंत दुकानावर कोसळून शाकीर पठाण नामक इसमाचा  जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाला.मृतक टाटा सुमोचा चालक व मालक होता. प्रकाश मेश्राम असे जखमीचे नाव असून ते किराणा दुकानदार आहेतअनेक मुख्य मार्गावर विद्युत तारा तुटल्या. यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.शाकीर पठाण असे मृतकाचे नाव असून तो . त्यांना नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. राईसमीलच्या या भिंतीला लागून चार दुकाने होती. सर्व दुकाने उद्ध्वस्त झाली. याशिवाय आदर्श जनता विद्यालय व महात्मा गांधी विद्यालयातील वर्गखोल्यांची छपरेही उडाली.

राजुरा येथील रेल्वे उडानपुलाजवळ बाभळीचे मोठे झाड पडल्याने बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राजुरा शहरात जुना व नविन बसस्थानकावर विजेच्या तारा पडल्या. त्यामुळे राजुरा येथील वीज पुरवठाही मध्यरात्री पर्यंत  खंडित राहिला.

कोरपना तालुक्यातील पिंपळगाव येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला. विज पडल्याने तालुक्यातील सोनुर्ली (वनसडी)येथील शेत शिवारातील अकरा शेळ्या जागीच मृत्यू पावल्या. तर दोन गंभीर रित्या जखमी झाल्या.निजामगोंदी येथील शेतकरी महादू चायकाटे यांच्या बैलावरही वीज कोसळल्याने बैल ठार झाला. शिवाय कोरपना, इंजापूर, सोनुर्ली, नारंडा, वनसडी येथे विद्युत खांब कोसल्याने अनेक ठिकाणी विजेच्या तारातुटून तालुक्यातील 70 गावे बुधवारी रात्री वीज पुरवठा खंडित होऊन प्रभावित झाली.

माऊली मंदिर, राजीव गांधी चौक परिसरातील विद्युत खांबावर एका घरावरून उडालेली टीन अडकून पडली. टेलीफोन एक्सचेंज कार्यालयामधील मोठे वृक्ष कोसळले. सोबतच दोन विद्युत खांबही कोसळले. राजीव गांधी चौकातील काही पानठेल्याची टिन पत्रे उडाली. याशिवाय कोरपना शहरातील अनेक घरांवरील छते उडाली. विद्युत खांब व वृक्ष विद्युत तारांवर कोसळल्याने कोरपना तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला.

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे गारपीट झाली. विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडितच होता. येनबोडी परिसरातील पळसगाव येथे वादळी पावसामुळे अनेक घराचे छत व टिनपत्रे उडून गेले.