महत्वाचे ब्रेकिंग : कोन आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण? :काय काम करतो ; इतर लोकांशी त्याचा संबध कसा आला? संशयित म्हणून कसा आढळला? कोन दवाखान्यात दाखल केले? ट्रॅव्हलिंग हिस्ट्री काय? आपल्या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे -खास वाचकांसाठी #who is first corona infected in chandrapur? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महत्वाचे ब्रेकिंग : कोन आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण? :काय काम करतो ; इतर लोकांशी त्याचा संबध कसा आला? संशयित म्हणून कसा आढळला? कोन दवाखान्यात दाखल केले? ट्रॅव्हलिंग हिस्ट्री काय? आपल्या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे -खास वाचकांसाठी #who is first corona infected in chandrapur?

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

आजपर्यंत एकही स्थायी कोरोना बाधित रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात नसताना काल दिनांक 2 मे ला रात्री 8:30वाजता अचानक एका संशियतचा अहवाल पॉसिटीव्ह आला व संपूर्ण जिल्ह्यात धक्कादायक खळबळ उळाली तेव्हापासून हा रुग्ण नेमका कोन व त्याबद्दल जाणून घेण्यास सर्वच उत्सुक आहेत.

प्रामुख्याने जिल्ह्यात एकही रुग्ण नसताना हा पॉसिटीव्ह आलाच कसा, याची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री काय आहे. हा रुग्ण जिल्हाबाहेर गेला की बाहेरून आला किंवा याला इतर दुसऱ्या कोणाकडून लागण झाली तर याला कोरोना विषाणू देणारा डोनर ˈला क्वॉरन्टीन् करण्यात आले आहेत काय? अश्या नानाविध चर्चा व त्यावर नानाविध प्रकारच्या कहाण्या आज संपूर्ण जिल्हाभर चर्चेत होत्या.

टीम खबरकट्टा च्या वाचकांशी संवादात काही धक्कादायक बाबी सुद्धा समोर आल्या म्हणून आम्ही वाचकांनी कोणत्याही अफवां,कथा-कहाण्यांना थारा न देता स्वतः दक्ष रहावे याकरिता  प्रकरणाची सखोल व अधिकृत माहिती आपणास देत आहोत. 


जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहिती व जिल्हा शल्य चिकित्सकांशी आमच्या झालेल्या अधिकृत संवादा नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण हा एक 50 वर्षीय इसम असून चंद्रपूर शहरातील मूल रोड स्तिथीस्थ इंदिरा नगर च्या मागील भागातील कृष्ण नगर येथे राहतो. 

1 मे रोजी छातीमध्ये दुखत असल्यामुळे हा व्यक्ती एका खाजगी डॉक्टरांकडे गेला असता त्यांनी लक्षणें बघून तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाला याची माहिती देत या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

छातीत दुखणे, दम, खोकला, निमोनिया सारखे लक्षणे असणाऱ्या या रुग्णाचे स्वॅब (थुंकीचे नमुने )2 मे रोजी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर 3 मे रोजी हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यावर आज त्याच्या परिवारातील इतर चार, पत्नी व दोन मुले यांचे नमुने घेऊन तपासणी करिता पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी म्हणजेच 4 मे ला प्राप्त होईल. 

23 एप्रिल पासून त्याला ताप जाणवत होता. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याला आयसोलेशन वार्ड मध्ये विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णावर ईलाज केलेल्या काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे .

हा रुग्ण मूल रोड वरील शिवाजीनगर परिसरात एका अपार्टमेंटमध्ये रात्रपाळीतील चौकीदार म्हणून काम करत होता. रात्री 7 ते सकाळी 6 या काळात सुरक्षारक्षक म्हणून तो कार्यरत असायचा. 

आता खबरदारी म्हणून त्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सहा कुटुंबातील 28 लोकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे.तर पाचव्या दिवशी या 28 नागरिकांचे नमुने घेण्यात येणार असून तपासणीला वैद्यकीय नियमानुसार पाठविण्यात येणार आहे.

त्याची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री समोर आली नसून त्याचा थेट संबंध येणाऱ्या कुटुंबाना कॉरेन्टाईन करण्यात आले असले तरीही त्याचा मुख्य डोनर समोर आला नसल्याने नागरिकांत भीतीदायक वातवरण आहे. 

म्हणून घरीच रहा. प्रशासनाला सहकार्य करा व स्वतःच स्वतः चे रक्षक बना.