ब्रेकिंग : रोटाव्हेटर मध्ये अडकून शेतकऱ्याचे दोन्ही पाय कापल्या गेले : शेतात नांगरणी करताना गंभीर अपघात :#tracter-rotavator - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : रोटाव्हेटर मध्ये अडकून शेतकऱ्याचे दोन्ही पाय कापल्या गेले : शेतात नांगरणी करताना गंभीर अपघात :#tracter-rotavator

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

येत्या महिन्यात शेतीचा खरीप हंगाम सुरु असून मागील रब्बी पिके निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतांची मळणी सुरु केली आहे. अनेक ठिकाणी जुनि नांगर -वखार पद्धत बंद होऊन, वखराची जागा आता ट्रॅक्टर - रोटाव्हेटरने  (नांगरणी यंत्र ) घेतली आहे. 

परंतु, कोणत्याही कृत्रिम यंत्राचा वापर योग्य पद्धतीने न झाल्यास अनेकदा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. असाच एक  भयंकर अनुभव राजुरा तालुक्यातील कोहोपरा येथील एका शेतकऱ्याला आज सकाळी आलं. 


आज दिनांक 16 मे ला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान कोहोपरा येथील शेतकरी मोहन रामदास पिंगे (45) आपल्या  शेतात रोटावेटर मारतेवेळी, नांगरणी सुरु असताना ट्रॅक्टर चालकाच्या मागील बाजूने बसून होते. अचानक रोटावेटर मध्ये काहीतरी अडकले व मोहन पिंगे यांचे पाय घसरून रोटावेटर मध्ये फसल्याने त्यांचे दोन्ही पाय कापल्या जाऊन गंभीर दुखापत झाली. 


भल्या सकाळी कोहोपरा येथे घडलेल्या या अपघाताची गावकऱ्यांना होताच 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले असून. या उमेदीच्या शेतकऱ्याचे दोन्ही पाय अपघातग्रस्त झाल्याने यंत्रांच्या योग्य वापराबाबत शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 

पुढे वाचा नांगर जाऊन रोटाव्हेटर कसे वापरात आले व वापरताना कशी घ्यायची काळजी व फायदे  -

1930 च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर) ही संकल्पना अमेरिकेत प्रसिद्ध झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर रोटाव्हेटरचा प्रसार पाश्‍चात्त्य देशांत झाला.मागील दोन दशकांपासून रोटाव्हेटर भारतात प्रसिद्ध झाला. एकदा रोटाव्हेटर फिरविल्यास एक नांगरणी व दोन कोळपण्या होत असल्याने पारंपरिक अवजारांपेक्षा रोटाव्हेटरला पसंती मिळते. अशा या रोटाव्हेटरमध्ये रोटाव्हेटर शाफ्ट, ब्लेड्स, गिअर बॉक्स असेम्ब्ली, स्पर गिअर असेम्ब्ली, रोटर असेम्ब्ली, ट्रेलिंग बोर्ड इ. भाग असतात.

रोटाव्हेटर वापरताना घ्यावयाची काळजी -

◾️रोटाव्हेटरच्या पात्यांचा (ब्लेड) वेग एका मिनिटाला ३५० फेरे इतका असतो. त्यामुळे अशा चालत्या रोटाव्हेरच्या पात्याच्या संपर्कात येऊ नये.
◾️वाफसा असलेल्याच शेतात मशागत करावी, अन्यथा माती शाफ्ट आणि आजूबाजूला चिकटते व रोटाव्हेटर कार्यक्षमतेने काम करू शकत नाही.
◾️शेतात मोठे दगड असतील तर ते बाजूला करावेत किंवा अशा शेतात रोटाव्हेटर करताना काळजी घ्यावी, कारण दगड पात्यात मध्ये आल्यास ते फिरताना अडचण येते व शाफ्टचा लॉक नट तुटतो. 
◾️हा लॉक नट शक्यतो लोड आल्यावर तुटेल असाच वापरावा, जास्त जड, न तुटणारा नट वापरू नये, कारण त्यामुळे गिअर बॉक्सला अडचण येऊ शकते.   
◾️ट्रॅक्टर व रोटाव्हेटरला जोडणारा शाफ्ट व्यवस्थित खाचेत लॉक करावा, जेणेकरून फिरताना तो निघू नये.
◾️दररोजची देखभाल रोटाव्हेटरच्या गिअरबॉक्‍समधील वंगण तेलाची पातळी तपासावी. आवश्‍यकता असल्यास त्वरीत वंगण तेल भरावे.
◾️गिअरबॉक्‍समधील वंगण तेलाची पातळी तपासावी, तसेच सर्व वंगण तेल बाहेर काढून गिअरबॉक्‍स स्वच्छ करावा व नवीन वंगण तेलाने भरावा.
◾️नांग्यांची पाती वाकलेली असल्यास हूक - पाना वापरून सरळ करावीत. नांग्या खराब झाल्या असल्यास बदलाव्यात.
◾️रोटाव्हेटरचे चेनकव्हर काढून चेन व स्प्रॉकेट चाकाची झीज तपासावी, तसेच चेनचा ताणही तपासावा व चेनला वंगण द्यावे. सर्व बेअरिंग्ज तपासून वंगण द्यावे.


रोटाव्हेटरचे फायदे -

◾️कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये याचा वापर करू शकतो.
◾️मुळापासून उपटून काढावयाच्या ऊस, कापूस, केळी, ज्वारी इ. पिकांमध्ये कार्यक्षम वापर पारंपरिक अवजारांपेक्षा कमी वेळेत चांगली मशागत करता येते.
◾️हिरवळीचे खत बारीक करून जमिनीत गाडण्यासाठी.चिखलणी करण्यासाठी, निंदणी करण्यासाठी.