चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या बछड्याची काेरोना टेस्ट, भोपाळहून येणार अहवाल -ए. एल. सोनकुसरे, विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर tigar-cab-undergoing-covid-19-testing-at chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या बछड्याची काेरोना टेस्ट, भोपाळहून येणार अहवाल -ए. एल. सोनकुसरे, विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर tigar-cab-undergoing-covid-19-testing-at chandrapur

Share This
वाघाच्या बछड्याच्या घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यास सांगण्यात आले आहे. लवकरच हा नमुना भोपाळला पाठवण्यात येईल. यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचेही सहकार्य मिळणार आहे. – ए. एल. सोनकुसरे, विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर.

खबरकट्टा / चंद्रपूर : मूल -

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी (दाबगाव) येथे शुक्रवार २४ एप्रिल रोजी सकाळी ३ ते ४ महिन्यांचा वाघाचा मादी बछडा सापडला होता. या बछड्याला चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेेंट सेंटरमध्ये पाठवले आहे. सध्या कोरोनाची साथ सुरू असल्याने या बछड्याचा स्वॅब नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. 

मात्र, पशुवैद्यकीय महाविद्यालयाने तांत्रिक कारणास्तव हा नमुना साभार परत केला. या संदर्भात पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता ए. टी. सोमकुंवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.

प्राण्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासण्याची मान्यता मध्य प्रदेेश, हरियाणा व उत्तर प्रदेश येथील प्रयोगशाळांना आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ, उत्तर प्रदेशातील बरेली व हरियाणातील हिस्सार येथे या प्रयोगशाळा आहेत. वाघाच्या बछड्याच्या घशातील स्रावाचा नमुना नाइट शिफ्टला तपासण्याचे ठरले होते. तत्पूर्वी सहकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत नागपूर प्रयाेगशाळेला प्राण्यांचे नमुने तपासण्याची मान्यता नसल्याने ते परत करून तपासण्यासाठी भोपाळ प्रयोगशाळेत पाठवण्यास सांगण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबंधितांना परत करण्यात आल्याचे ए. टी. सोमकुंवर यांनी सांगितले.