चंद्रपूर तापमानाचा पारा वाढला : ब्रम्हपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद -#temperature-at-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर तापमानाचा पारा वाढला : ब्रम्हपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद -#temperature-at-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


विदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. मात्र यंदा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यातदेखील पाऊस पडला. एवढेच नाही तर एप्रिल महिन्यामध्येही विदर्भात पावसाने हजेरी लावली होती. त्याचा परिणाम येथील तापमानावर झाला. त्यामुळे एरवी मार्चपासून बसणारे उन्हाचे चटके यंदा मे महिन्यापासून जाणवायला लागले आहेत.

वेधशाळेने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी अकोलामध्ये सर्वाधिक म्हणजे ४४.९ अंश सेल्सिअस 
नोंद झाली.विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानात दोन दिवसात अचानकपणे वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी येथील तापमानात ०.९ अंशाने वाढ होऊन तेथील तापमान ४४.१ अंश सेल्सिअसवर पोहचले. चंद्रपुरातही १.३ अंशाने वाढ होऊन रविवारचे तापमान ४३.८ नोंदविण्यात आले आहे. 

अमरावतीमधील तापमानात शनिवारपेक्षा घट होऊन ४३.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. गडचिरोलीमधील तापमानातही जवळपास २ अंशाची वाढ झाली आहे.


मागील आठवड्यात दिवसात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता. काही ठिकाणी वादळ येऊन व गारांचा पाऊसही पडला होता. त्यामुळे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा कमी तापमानाचा राहिला. 

मात्र मे महिन्याच्या प्रारंभापासूनच उन्हाने आपली दाहकता सुरू केली आहे.दाहकता वाढली दोन दिवसापासून विदर्भात उन्हाची दाहकता वाढली आहे. कोरोनामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना भरचौकांमध्ये वाढलेल्या उन्हाचाही सामना करावा लागत आहे. नागरिक कामासाठी तुरळक प्रमाणात घराबाहेर पडत असले तरी दुपारी मात्र रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. जनावरेही झाडांचा आश्रय शोधत आहेत. 

असे आहे विदर्भातील रविवारचे तापमान
अकोला - ४४.९
नागपूर - ४४.२
वर्धा - ४४.२
ब्रह्मपुरी - ४४.१
चंद्रपूर - ४३.८
अमरावती - ४३.८
गोंदिया - ४२.६
गडचिरोली - ४२
बुलडाणा - ४१.४