पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची गोळ्या झाडून आत्महत्या #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची गोळ्या झाडून आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / गडचिरोली,दि.07ः- 

जिल्ह्यातील अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या मूलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धनराज क्षिरसाट यांची पत्नी संगीता (28) हिने राहत्या घरात स्वतःवर राइफलने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना आज(दि.7)घडली.

राईफलीचा आवाज येताच मुलांनी आरडाओरड करताच शेजार्यांनी धाव घेतली.संगीताला जखमी अवस्थेत बघून मुलचेरा पोलीसांनी तातडीने चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी दाखल केले असता डॉक्टरानी मृत घोषित केले.

पोलिसांनी याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.मृतक महिलेला दोन अपत्य आहेत.घटनेच्या दिवशी पती पोलीस उपनिरिक्षक धनराज शिरसाठ हे नक्षलविरोधी अभियान राबवून पोमके मुलचेरा येथे परतले होते.त्यांनतर ते आईवडिलासंह मुलचेरा येथे कामानिमित्त गेले असता पत्नी संगीताने दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान स्वतःवर गोळी झाडली.