शेतात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या : मृतक - रवी निमकर, लखमापूर #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या : मृतक - रवी निमकर, लखमापूर #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात 

कोरपना तालुक्यातील गडचांदूर नजीक लखमापूर गावातील युवक त्याच्याच शेतशिवारात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ आहे. काही दिवसांपूर्वीच गावाच्या पोलीस पाटलाने अश्याच प्रकारे आत्महत्या केल्याचे दुःख गावकरी विसरायचा आतच ही दुसरी घटना उघडकीस आल्याने समाजमन हळहळले आहे. 

अधिक माहिती नुसार लखमापूर येथील रहिवासी विलास निमकर यांची लगतच्या कुकूडसाथ गावाच्या शिवारात शेती आहे. आज सकाळी शेतातील त्यांच्या उन्हाळी गोठ्यात मुलगा रवी विलास निमकर (24) गळफास घेतलेल्या स्तिथीत आढळून आला. परिवाराने दिलेल्या माहिती नुसार काल रात्री पासून तो घरी परतला नव्हता. 

वृत्त लिहेस्तव गडचांदूर पोलीस चमू घटनास्थळी रवाना झाली असून मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात आहे.