रेती तस्कराकडून महिला सरपंचाला असभ्य भाषेत शिवीगाळ आरोपीला अटक व जामीन ; वनोजा - कळमना घाटावरील घटना#sandtrafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रेती तस्कराकडून महिला सरपंचाला असभ्य भाषेत शिवीगाळ आरोपीला अटक व जामीन ; वनोजा - कळमना घाटावरील घटना#sandtrafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना - 

तालुक्यातील वनोजा येथील महिला सरपंच्यास एका रेती तस्करांकडून  शिवराल भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली. यावरून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

कोरपना तालुक्यात पैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात आहे. याबाबतची तक्रार वनोजा च्या सरपंच सविता पेटकर यांनी प्रशासनास केली होती. या अनुषंगाने नदी घाटावर जेसीबीने मार्ग बंद करून चोरटी वाहतूक बंद करण्यात आली. तरी मात्र यवतमाळ जिल्ह्यातील कळमना येथून नदी मार्गे प्रवेश करत वनोजा हद्दीत रेतीची उपसा केली जात आहे.

यासंबंधीची माहिती पेटकर यांनी संबंधित तलाठी यांना दिली. तलाठी नी स्वतः न येता कोतवालांना पाठवले. त्याना ही तस्करीची बाब प्रत्यक्षास निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मदतीस सरपंच व पोलीस पाटील तिथे गेले. मात्र कारवाई होईल या भीतीने रेती तस्कर रमेश (शंकर) नवले यांनी ट्रॅक्टर मधील सर्व रेती उतरवून मजुरांना वापस पाठवून नको त्या असभ्य भाषेत महिला सरपंच पेटकर यांना शिवीगाळ केली. 

त्यामुळे त्यांनी कोरपना पोलीसात तक्रार दाखल केली. यावरून आरोपी विरुद्ध कलम २९४,५०४,५०६ अनवे गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून  जामिन देण्यात आला आहे. परंतु रेती घाटात मोठ्या प्रमाणात होणारी रेती उपसा आज ही थांबली गेली नाही. त्यामुळे प्रशासना पेक्षा रेती तस्करच वरचढ होताना दिसते आहे. त्यामुळे ही मुजोरी थांबवावी व आरोपीस कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.

शासनाच्या वतीने रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी गाव पातळीवर अमलबजावणी करण्याचे सांगितले जाते.मात्र कुठलेही त्या संबंधी कारवाईचे चे अधिकार नाही. त्यामुळे गाव भल्याच्या दृष्टीने विचार करणाऱ्या सरपंचांना अशा घटनांना सामोरे जावे लागते. या दृष्टीने कायद्यात बदल करून गाव पातळीवरील प्रशासना स अधिकार देण्यात यावे अशी मागणी सरपंच सविता पेटकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.