धक्कादायक गंभीर ! : अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पालटून दोन मजुरांचा मृत्यू - दोघे जखमी : तस्करीतील ट्रॅक्टर कोरपना नगरसेवकविजय तेलंग यांच्या मालकीचे#sandtrafficking-2-dead-at-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक गंभीर ! : अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पालटून दोन मजुरांचा मृत्यू - दोघे जखमी : तस्करीतील ट्रॅक्टर कोरपना नगरसेवकविजय तेलंग यांच्या मालकीचे#sandtrafficking-2-dead-at-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

लॉकडाऊन काळातही चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पैनगंगा-वर्धा नदी लगतच्या अनेक पात्रातुन अवैध वाळू  तस्करीचे उत्खनन व वाहतूक सुरु असून याबाबत टीम खबरकट्टा ने अनेक वेळा कोरपना तालुका ते जिल्हा प्रशासनाला अवगत करून कार्यवाहीची सतत मागणी करीत आहे. 

तारिही वेळेपुरते थातुरमातुर कार्यवाही करीत तालुका प्रशासन या अवैध तस्करीला सातत्याने ढील देत असून याचा फटका दोन मजुरांना आपल्या प्राणास मुकून त्यांच्या कुटुंबाला सहन करण्याची वेळ आली आहे. 

कोरपना तालुक्यातील तांबाडी (तुळशी - जेवरा) गावानजीक पैनगंगा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करताना काल रात्री (आजच्या सकाळी -पहाटे 3वाजताच्या सुमारास ) ट्रॅक्टर क्रमांक MH 34 L 9458 पलटी होऊन दोन मजूर अनिल केशव परचाके व शेषराव नैताम दोन्ही राहणार धानोली तांडा याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर दोन रामराव परचाके व शंभु मडावी मजूर गंभीर जखमी अववस्थेत आहेत. 

सदर अवैध वाळू तस्करीचे पलटी गेलेले ट्रॅक्टर MH 34 L 9458 कोरपना नगरपंचायत येथील काँग्रेस चे विद्यमान नगरसेवक विजय तेलंग यांच्या मालकीचे असून मृत दोन्ही मजूर नजीकच्या धानोली तांडा येथील रहिवासी तर ट्रॅक्टर चालक बोरगाव खुर्द येथील आहे. चालकासहित आणखी एक मजुर गंभीररित्या जखमी झाले आहे.

दरम्यान या गंभीर प्रकारची वार्ता पंचक्रोशीत पसरता धानोली तांडा येथील मृतकांच्या कुटुंबासहित नागरिकांनी घटनास्थळाचा घेराव केल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कोरपना पोलीस प्रशासनाने नियंत्रण मिळविले आहे. 

घटनेतील जखमींवर कोरपना येथे उपचार सुरु असून वृत्त लिहेपर्यंत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून दोन्ही मृतकांचे शव शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले होते. 

सकाळी सकाळी तुळशी - जेवरा - गांधीनगर - बोरगाव -धानोली लगतच्या पंचक्रोशीत ही दुःखद वार्ता पसरल्याने हळहळ व प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे. 

वनोजा पुलालाही मोठा धोका - कधीही कोसळण्याची भीती  - सौ. सविता पेटकर, सरपंच, वनोजा 

या परिसरातच चंद्रपूर - यवतमाळ (वणी ) जोडणाऱ्या वनोजा नदी वरील पुलाच्या खालूनही, पुलाच्या पिलर लगत मोठमोठे खड्डे करून रेती उत्खनन सुरु असून याबाबत वारंवार तहसीलदारांना तक्रारी दिल्या असून हायवा ट्रक ने वाहतूक तस्करी सुरु असून, दोन महिन्यापूर्वी तालुका प्रशासनाने हा अवैध घाट नाली खोदून बंद केल्यावरही लगेच 4 -5 दिवसात पुन्हा उत्खनन सुरु झाले असून याचा नदीवरील पुलाला नदी पात्रातून व जड वाहतुकीमुळे धोका निर्माण झाला आहे

आजच्या या गंभीर घटनेचे संपूर्ण जिल्ह्यात पडसाद उमटत असून राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ऍड. संजय धोटे यांनी सुद्धा तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून परीसरातील सर्व अवैध घाट बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून केली आहे. 

तांबडी, तुळशी गावानजीक आज पहाटे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून कोरपना तालुक्यातील अनेक गावांतून अवैध रेती तस्करीची मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवली आहे. आपण या पूर्वी सुद्धा जिल्हा प्रशासनाला  या परीसरातील वनोजा -सांगोळा -कारवाही -भारोसा -भोयेगाव -तुळशी- जेवरा -पिपरी -नारंडा (झोटिंग ) या गावालगतचे सर्व अवैध वाळू घाट बंद करून, तस्करी थांबावी याबाबत तक्रार सादर केली आहे. आजच्या घटनेतील मुख्य आरोपी मालक यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याला कोणतीही ढील देण्यात येऊ नये जेणेकरून पुन्हा गरीब मजुरांना जीवास मुकावे लागणार नाही अशी विनंती ही जिल्हाधिकाऱ्यांना आज सकाळी केली आहे. -ऍड. संजय धोटे, माजी आमदार, राजुरा