अवैधरित्या वाळु वाहतुक प्रकरणी वनविभागाने केले ट्रक्टर जप्त #sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैधरित्या वाळु वाहतुक प्रकरणी वनविभागाने केले ट्रक्टर जप्त #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -

बल्लारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र कळमना मधील लावारी-1 बिटातील कक्ष क्र. 515 मध्ये दिनांक 31/05/2020 ला पहाटे 04.00 वा. अवैधरित्या खोदकाम करुन वाळुची वाहतुक करतांना ट्रॅक्टर वर जप्तीची कार्यवाही केली आहे. 

यात मनोज लल्लुमनी प्रसाद रा. ऐडसी यांच्या मालकीच्या स्वराज 735 PF, निळा रंग, ट्रक्टर क्र. MH 34 AP 2356, ट्रॉली क्र. MH 34 F 3284 ट्रक्टर वाहन जप्तीची कार्यवाही करुन प्राथमिक गुन्हा क्र. 8/15 भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 2, 26 (1) ग अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोपी नामे

1. रुपेश भोलानाथ कोडापे रा. केम
2. मारोती गजानन मडावी रा. केम
3. शुभम संजय मडावी रा. केम
4. मनोज लल्लुमनी प्रसाद रा. ऐडसी 

या चालक व ट्रॅक्टर मालकांना ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह श्री. संतोष थिपे यांचे मार्गदर्शनात पुढील तपास श्री. आकाश मल्लेलवार, क्षेत्र सहाय्यक कळमना, श्री. एम. जी. धाईत वनरक्षक लावारी-1 करीत आहे.