रेती तस्करी संदर्भात प्रशासनाने नियोजन करून तस्करांवर कठोर कारवाईकरण्याकरिता पोलीस प्रशासनाला मोकळीक देण्याची मागणी--सुरज ठाकरे #sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रेती तस्करी संदर्भात प्रशासनाने नियोजन करून तस्करांवर कठोर कारवाईकरण्याकरिता पोलीस प्रशासनाला मोकळीक देण्याची मागणी--सुरज ठाकरे #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नाल्यावरची व वनविभागा अंतर्गत नाल्यावरची रेती तस्करी प्रचंड प्रमाणात होत असून यावर महसूल विभागा तर्फे व वनविभाग तर्फे कुठलेही ठोस पाऊलं उचलण्यात येत नाही व जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे, या वरून  रेती तस्कर आणि महसूल विभाग व वनविभाग यांची आर्थिक व्यवहाराची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सदर क्षेत्रात अविरत चालणाऱ्या या तस्करीवर कायमचा अंकुश लावणे आवश्यकता आहे असे मा.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे त्याच प्रमाणे  राजुरा विधानसभा क्षेत्रात जेवढे ट्रॅक्टर,ट्रक, हायवा,आहेत यांच्या  मालकांची यादी महसूल विभागाने तयार करून शहरी भागात महसुली च्या जागेवर सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजे पर्यंत सदरच्या वाहना करीता पार्कींग ची जागा महसूल विभाग तर्फे देऊन त्याच्या देखरेखे खाली उभ्या कराव्या आणि ग्रामीण भागात ग्राम पंचायतच्या पटांगणावर पार्कींगची व्यवस्था ग्राम पंचायत च्या देखरेखे खाली करण्यात यावी. 

जेणे करून रात्री च्या वेळी होणारी रेतीची तस्करी संपुष्ट।त येईल. कृपया या नियोजनाची दखल घेऊन रेती तस्करी करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाला रात्रीच्या गस्ती दरम्यान फिरणाऱ्या वाहनावर  कठोर कारवाई करण्याचे मोकळीक पोलिस प्रशासनाला देण्यात यावी हि विनंती. 

जेणे करून रेती तस्करी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकां कडून अधीकारी ,कर्मचारी,लोकांना जीवे मारण्याचे प्रकार होणार नाही व या क्षेत्रात भविष्यात पाणी टंचाईचे भीषण आकाल पडणार नाही. करीता सदर निवेदन सुरज ठाकरे यांनी मा.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.