ब्रेकिंग : रानडुकराच्या धडकेत कार चकणाचुर : एक जागीच ठार -पाच गंभीर जखमी #road-accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : रानडुकराच्या धडकेत कार चकणाचुर : एक जागीच ठार -पाच गंभीर जखमी #road-accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
रानडूकराने कारला जबर धडक दिल्याने एकाच कुटूंबातील एक ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.धडक इतकी जबर होती की ही चारचाकी मुख्य मार्गावरुन लांब फेकल्या गेली. मोतीराम आत्राम असे मृतकाचे नाव आहे. ही घटना राजूरा तालूक्यातील चनाखा मार्गावर मंगळवारला रात्रौ 12 वाजताचा सूमारास घडली. जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.


राजूरा तालूक्यात येणाऱ्या कविठपेठ येथिल मोतीराम विठू आत्राम हे आपल्या परिवारासह राजूरा येथिल रवि कोडापे या नातेवाईकाकडे गेले होते. 

मंगळवारला रात्रौ उशिरा रवि कोडापे यांचा कारने आत्राम कुटूंबिय आपल्या गावाकडे निघाले . कार मध्ये मोतीराम आत्राम,साधना आत्राम,रुणाली आत्राम,समिक्षा आत्राम बसले होते. तर रवि कोडापे कार चालवित होते. 


चनाखा गावाजवळ अचानक झूडपातून आलेल्या रानटीडुकराने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कार मार्गावरुन लांब फेकल्या गेली. यात मोतीराम आत्राम यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर पाच जण गंभीर जखमी आहेत.


घटनेची माहीती विरुर पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून जखमीना उपचारासाठी चंद्रपूरला हलविले. पुढील तपास विरुर पोलीस करित आहेत.