थरार ! समोरून वेगवान धावत येणाऱ्या गाडीचा : नशीब बलवत्तर म्हणून वाचले संजय गजपुरे #वाचा शहरे आणणारा अपघात #road accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

थरार ! समोरून वेगवान धावत येणाऱ्या गाडीचा : नशीब बलवत्तर म्हणून वाचले संजय गजपुरे #वाचा शहरे आणणारा अपघात #road accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर : 
 
जि.प. सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री हे कार्यालयीन व पक्षीय काम आटोपुन गुरुवारी रात्री नागभीडला परत जात असतांना चंद्रपुर पासुन मुल मार्गावर 10 किमी. अंतरावरील बोर्डा फाट्याजवळ झालेल्या वाहन अपघातात सुखरुप बचावले आहेत. त्यांच्या स्कार्पिओ वाहनाला विरुध्द दिशेने आपली बाजु सोडुन निष्काळजीपणाने चालवित येणाऱ्या MH 34 AM 2711 या चारचाकी वाहनाने जबर धडक दिली. यावेळी गजपुरे यांचे समवेत नागभीड ग्रा.पं.चे माजी सदस्य सचिन चिलबुले व मनोज कोहाड हे होते.


गजपुरे यांच्या वाहनचालकाने समोरील चार चाकी वाहन आपल्या वाहनावर येत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखुन आपले वाहनाचा वेग कमी केल्याने कुठलीही जिवितहानी झाली नाही. पण दोन्ही वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या अपघातातात एअर बॅग व सिटबेल्ट मुळे संजय गजपुरे व त्यांच्या वाहनचालकाला मात्र कुठलीही दुखापत झाली नाही. 

याही परिस्थितीत त्यांनी १०८ क्र. च्या ॲम्बुलन्सला बोलावुन समोरील अपघातग्रस्त गाडीतील वाहन चालकाला पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथील दवाखान्यात रवाना केले. सदर वाहनचालक दारुच्या नशेत तर्र होता व आपली बाजु सोडुन चालवित तसेच भरधाव वेगाने स्कार्पिओला धडक दिली.


या घटनेची माहिती मिळताच चंद्रपुर जि.प. चे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, चिचपल्लीचे जि.प. सदस्य गौतम निमगडे व सिंदेवाहीचे पं.स. सदस्य रितेश अलमस्त त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. 

चंद्रपुरचे उपमहापौर राहुल पावडे यांनी रामनगर पोलीस स्टेशनला या अपघाताची माहिती दिली. चिचपल्ली येथील पोलीस चौकीच्या हवालदारामार्फत स्थळ पंचनामा करुन मार्ग मोकळा करुन वाहतुक सुरळीत केली. या मार्गाने परत जाणाऱ्या जि.प. चे काॅंग्रेस गटनेते सतिश वारजुकर व नागभीड न.प.चे नगरसेवक प्रतिक भसिन यांनीही घटनास्थळी थांबुन विचारपुस केली.

रात्री उशिरा संजय गजपुरे यांच्या वाहनचालकाने , धडक दिलेल्या वाहनचालकाविरोधात रामनगर पो.स्टे ला तक्रार दाखल केली आहे. स्कार्पिओ वाहनात असलेल्या कुणालाही जबर धडक बसुनही कुठलीही दुखापत झालेली नाही.