होमगार्ड अधीक्षक शंकर सीटलवार याचा गंभीर अपघात :अ‍ॅड. चटप यांची मदतीने वाचले प्राण #road accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

होमगार्ड अधीक्षक शंकर सीटलवार याचा गंभीर अपघात :अ‍ॅड. चटप यांची मदतीने वाचले प्राण #road accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

कोरपना तालुक्यातील  हरदोना या गावाजवळ स्वतः च्या चारचाकी गाडीने गडचांदूर मार्गे जात असताना राजुरा येथील पोलीस होमगार्ड अधीक्षक शंकर सिटलवार यांचा गंभीर  अपघात झाल्याची घटना घडली असून त्यात त्यांची गाडी अक्षरशः चकणाचुर झाली व त्यांना गंभीर दुखापत झाली. 

सविस्तर माहिती नुसार होमगार्ड अधीक्षक शंकर सिटलवार हे  कोरपना तालुक्यातील खिर्डी या गावचे रहिवासी आहेत. आज दुपारी राजुरा येथून गडचांदूर मार्गे खिर्डी येथे जात असताना  समोरून भरधाव गाडी येत असल्यामुळे 'कट' मारण्याचा प्रयत्न केला असता पोलीस होमगार्ड यांची गाडी बाभळीच्या झाडाला आदळली. 

त्यातुन  त्यांचे डोके फुटून रक्त वाहू लागले व जबर दुखापत झाली. घटनास्थळी लोक गोळा होऊ लागले. परंतु, कोणीही 'त्या' पोलीस होमगार्डची मदत करण्यास पुढे येत नव्हते. 

दरम्यान अ‍ॅड. वामनराव चटप यांची 'विदर्भ रथ' नावाने प्रसिद्ध असलेली गाडी त्या ठिकाणाहून जात होती. जमलेली गर्दी बघता अ‍ॅड. चटप यांनी गाडी थांबवली. तेव्हा पोलीस होमगार्डला जबर दुखापत झालेली बघून त्यांनी थेट आपल्या गाडीत  पोलीस होमगार्डला बसवले. पुढचा दौरा रद्द करून ड्रायव्हरला गाडी थेट गडचांदूर  ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे पोहचल्यानंतर डॉक्टरांची भेट घेत तात्काळ उपचार करण्याची विनंती केली.  'मेडिको-लीगल' केस असल्याने पोलिस स्टेशनला कळवा अशा सूचना दिल्या. 

अ‍ॅड. चटप यांनी केलेल्या मदतीमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला असून एका लोकप्रतिनिधीची माणुसकी या घटनेतुन दिसून आली आहे. अनेक आजी माजी आमदारांच्या गाडीच्या काचा देखील खाली उतरत नाही. अ‍ॅड. वामनराव चटप हे मात्र या बाबतीत अपवाद ठरले आहे. अगदी वेळेत दवाखाण्यात पोहचवल्यामुळे त्या पोलीस होमगार्डची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून सीटलवार परिवाराने त्यांचे आभार मानले आहे.