सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानात मद्यधुंद नोकराची ग्राहकाला अमानुष मारहाण #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानात मद्यधुंद नोकराची ग्राहकाला अमानुष मारहाण #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यास गेलेले श्री. चंद्रकांत विष्णुपंत कुळकर्णी यांना दुकानातील सतीश कामठे आणि लड्डू पाटील या दोघांनी मद्यधुंद अवस्थेत बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

चंद्रकांत विष्णुपंत कुळकर्णी हे राजुरा येथील दत्त मंदिर गढी वॉर्ड येथील पुजारी असून स्वांतत्र्य संग्राम सैनिक तसेच माजी आमदार, राजुरा स्व. श्री. शंकरराव देशमुख यांचे जावई आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिनांक ७/५/२०२० रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ग्रामीण बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित माळी वॉर्ड येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक आर -००६ येथे धान्य घेण्यास गेले असताना दुकानातील सतीश कामठे आणि लड्डू पाटील या इसमाने मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करून त्यांना अमानुषपणे मारहाण  करून जिवे मारण्याची धमकी दिली.

उल्लेखनीय असे की चंद्रपूर जिल्हा दारूबंदी असताना सुद्धा सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानात वितरक मद्यधुंद अवस्थेत दुकानात आलेल्या लोकांसोबत असभ्य वर्तन करीत आहे. सदर प्रकरणाची तक्रार मा. तहसीलदार साहेब राजुरा आणि पोलिस विभागाकडे श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी केली आहे. या घटनेचा गावातील विविध स्तरातून निषेध नोंदविला आहे. 

सदर स्वस्त धान्याच्या दुकानाच्या बाबतीत लोकांच्या याआधीही बऱ्याच तक्रारी असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी गावातील लोकांकडून करण्यात येत आहे.