प्रतिबिंब' च्या माध्यामातून घराघरात पोहचतोय राहूल पेंढारकर* -लॉक डाऊनच्या काळात घेतोय प्रेरनात्मक वाटचालीचा ऑनलाईन आढावा #pratibimb - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रतिबिंब' च्या माध्यामातून घराघरात पोहचतोय राहूल पेंढारकर* -लॉक डाऊनच्या काळात घेतोय प्रेरनात्मक वाटचालीचा ऑनलाईन आढावा #pratibimb

Share This
खबरकट्टा / विशेष : 

कोविड19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर सम्पूर्ण देश लॉक डाऊन आहे. अशावेळेस राहूल पेंढारकर कर्तव्यनीष्ट व्यक्तींचा प्रेरनात्मक वाटचालीचा आढावा ऑनलाईन मुलाखतीच्या माध्यमातून घेत आहे. चंद्रपूर येथील एस.आर.एम.समाजकार्य महाविदयालयात शिकत असताना 'प्रतिबिंब' ची कल्पना राहूलला सुचली. प्रा. डॉ जयश्री कापसे-गावंडे यांच्या मार्गदर्शनात,श्रीराम पान्हेरकर आणि सारिका उराडे, टीना उराडे, गजानन भोसले, मयूर सेठीया यांच्या सहकार्यानी दहा लोकांच्या चमूसह 'प्रतिबिंब' चे प्रारूप उभे राहिले आहे.
 
प्रतिबिंब' म्हणजे आपला जीवन आरसा असतो, त्यात स्वतःला बघता येत, तसेच आपला जीवन प्रवास म्हणजेच 'प्रतीबिंब...!'  

'प्रतिबिंब' हे व्यक्त होण्यासाठी एक माध्यम आहे. समाजातील कर्तव्यनीष्ट व्यक्तींचा प्रेरनात्मक वाटचालीचा आढावा घेवून, ते समाजापर्यंत पोहचवीणे आणि तरुण पिढीला सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे हा एकमेव 'प्रतिबिंब' चा प्रामाणिक हेतू आहे. 

समाजात उल्लेखनीय कार्य केलेले लेखक, दिग्दर्शक, निर्माता, नाट्यकलावंत,डॉक्टर्स,  प्राध्यापक, शिक्षक, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ता, उध्योजक, पोलीस कर्मचारी, पत्रकार ह्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेऊन 'प्रतिबिंब'च्या  you tube चेनेलवर या उपक्रमाचे प्रसारण होत आहे. चंद्रपूर, पुणे, गडचिरोली जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ट व्यक्तींची मुलाखत झाली असून या उपक्रमाला तिन आठवड्यात  5000 हून जास्त लोकांनी सोशियल मीडियावर पसंती दाखवली आहे. या उपक्रमाचे संचालक राहूल पेंढारकर असून स्वतः 'प्रतिबिंब' या उपक्रमात निवेदन करीत आहेत.