संपर्कमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या तर्फे चंद्रपुरात गरजूंना धान्य वाटप. #prajakt-tanpure - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संपर्कमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या तर्फे चंद्रपुरात गरजूंना धान्य वाटप. #prajakt-tanpure

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर:- 

महाराष्ट्र राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री मा. ना. प्राजक्त तनपुरे हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले होते. 

कोरोनाने थैमान घातल्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला असून या संकटात अनेकांच्या पूढे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे तर अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. लॉकडाऊन च्या याकाळात अनेकांना मदतीची गरज आहे. 

नामदार तनपुरे कोरोना संबंधाने जिल्ह्याच्या आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी संपर्कमंत्री पदाची जवाबदारी स्वीकारलेल्या या जिल्ह्यातिल गरजु नागरिकांना प्राधान्याने धान्य किट वाटप करून थोडक्यात का होईना परंतु कर्तव्य समजून मदत करन्याचे ठरविले आणि जिल्हाधिकारी कार्यालयातिल आढावा बैठक संपल्यानंतर शहरातील अनेक गरजूंना सोशल डिस्टनसिंग चे कठोरपणे पालन करीत नामदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः पुढाकार घेत ६०० किटचे वाटप केले. 

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, नगरसेवक दीपक जैस्वाल, राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, मंगला आखरे, बेबीताई उईके, संजय वैद्य, प्रदीप रत्नपारखी, निमेश मानकर, संजय ठाकूर, अभिनव देशपांडे, कुणाल ठेंगारे, अमोल ठाकरे, राहुल आवळे हे उपस्थित होते.