ब्रह्मपुरी ठाणेदारांकडुन आजारी व्यक्तीस अमानुष मारहाण #paralyse-men-beat-up-by-bramhapuri-police - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रह्मपुरी ठाणेदारांकडुन आजारी व्यक्तीस अमानुष मारहाण #paralyse-men-beat-up-by-bramhapuri-police

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी -

लॉकडॉऊन काळात एका सेवानिवृत्त लकवा ग्रस्त कर्मचाऱ्यांला ब्रम्हपुरी चे ठाणेदार प्रमोद मक्केश्वर यांनी अमानुष पणे मारहाण केल्याचा गंभीर तथा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. 

ठाणेदारांकडुन ही मारहाण इथपर्यंतच नाही थांबली नाही तर त्या लकवा ग्रस्त व्यक्ती ला पोलिसांच्या गाडीत एखाद्या सराईत गुन्हेगार प्रमाणे कोंबुन पोलीस ठाण्यात नेत तीथेही एका बंद खोलीत त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्याला व्रण येईपर्यंत मारण्यात आले. वेदनांनी लकवा ग्रस्त व्यक्ती विनंती करत होता पण बेभान झालेल्या ठाणेदार यांनी एक सुध्दा ऐकले नाही. ही घटना पहिलीच नाही. 

तर बंद खोलीत मारण्याचा प्रकार ब्रम्हपुरी बस डेपो मधील टीप्पर चोरी झालेल्या टिप्पर मालकांनी अटकपूर्व जामीन घेऊन लेटर पोलीस ठाण्यात नेऊन दिला असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली होती.

सविस्तर माहिती या प्रमाणे आहे स्थानिक टिळक नगरातील चक्रधर जांभुळे हे ब्रह्मपुरी बस आगारात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा आजार जडल्याने त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली. गेल्या दोन महिन्यापासून लॉकडॉऊन च्या काळात घरीच असल्याने 14 मे रोजी सायंकाळी घरापासून पायी पायी एक किमी अंतरावरील बसस्थानकाजवळ गेले. तिथपर्यंत गेल्यावर त्यांना थकवा जाणवल्याने एका ठिकाणी बसून तोंडाला मास्क लावलेला रुमालाने चेहऱ्यावर आलेला घाम टिपत होते. 

तेवढ्यात ठाणेदार मकेश्वर व त्यांचे दोन शिपाई शासकीय वाहनाने येथे आले. तुझा माक्स कूठे आहे, असे म्हणत आजारी चक्रधर जांभुळे यांना पॉलिसी पेनी काठीने व ठाणेदार यांनी लाथांनी मारले. जांभुळे यांना मारतांना ठाणेदार जवळ गयावया करून मी आजारी आहे. अशी विनवणी करत होती. मात्र ठाणेदार यांनी त्यांच्या वयाचा व आजाराबद्दल कुठलीच दया-माया न दाखविता लाथा बुक्क्यांनी मारणे सुरू ठेवले.

तेवढ्यावरच न थांबता जांभुळे यांना पोलीस ठाण्यात नेऊन तिथे हातापायावर व पाठीवर व्रण येईपर्यंत पुन्हा मारहाण केली. त्यानंतर माफीनामा लिहून सोडून दिले एरवी लॉकडॉऊन मध्ये मास्क न लावल्याने शासन 200 रुपयांचा दंड आकारत असताना चक्रधर जांभुळे यांनी तोंडाला मास्क म्हणून लावलेला रुमालाने चेहर्‍यावरचा घाम पुसत तो रुमाल खिशात ठेवला. मात्र ठाणेदार मक्केशवर यांनी मास्क न घालण्या ऐवजी एखाद्या आजारी व्यक्ती ला एवढी मोठी अखोरी शिक्षा दिल्याने ते शासन आणि कायद्या पेक्षा मोठे आहेत काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 

यापूर्वी सुध्दा लॉकडॉऊन च्या काळात एका भडके नामक शिक्षकाला ठाणेदार मक्केश्वर यांनी निर्दयी मारहाण केली. सदर दोन्ही घटनांमुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रती ठाणेदारांची वागणुक ही आपण जनतेचे नोकर नाहीत तर मालक आहोत अशी दादागिरीची भावना दिसुन येत आहे. त्यामुळे खाकी वर्दीतील पोलीस हे जनतेचे 'रक्षक' म्हणायचे की जनतेसाठी 'राक्षस' या बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

ठाणेदार प्रमोद मक्केश्वर हे ज्या ज्या ठिकाणी कार्यरत होते. त्या त्या ठिकाणी वादग्रस्त राहिले आहेत. अत्यंत तापट व प्रत्येक वेळी शिवराळ भाषा वापणार्‍या या अधिकाऱ्यांची आजपर्यंतची नोकरी वादग्रस्त ठरली आहे. आजपर्यंत च्या कारकिर्दीत त्यांच्या वर तीन - चार विभागीय चौकशी चा ससेमिरा सुरू आहे. त्यांनी अनेक गंभीर प्रकरणांच्या तपासात जाणुनबुजून हयगयत केली आहे. ठाणेदार मकेश्वर यांच्या नोकरीच्या कारकिर्दीतील गोपनीय माहिती (सीआर) वरीष्ठांनी काढल्यांस ही व्यक्ती म्हणजे पोलीस खात्यासाठी 'कंलक' च आहे. यांची माहिती समोर येईल हे मात्र निश्चित.