मजुरांना किती छळणार? : आता तरी ही हेळसांड थांबवा -नम्रता ठेमस्कर (राजकीय विश्लेषक, चंद्रपूर ) #namrata-themaskar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मजुरांना किती छळणार? : आता तरी ही हेळसांड थांबवा -नम्रता ठेमस्कर (राजकीय विश्लेषक, चंद्रपूर ) #namrata-themaskar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : विशेष -नम्रता ठेमस्कर


मजुरांना आपल्या गावी परत पाठवलं जाईल असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, पण त्यात एकवाक्यता दिसत नाही.अजूनही लाखो मजूर देशात सगळीकडे अडकले आहेत, जर हेच मजूर आपल्या गावी आधी गेले असते तरी फार काही बिघडलं नसतं तरीही त्यांना एवढे दिवस हालअपेष्टा सहन करत जगावं लागतंय. 

केंद्र सरकारने लॉक डाऊन सुरू झाल्यापासून कितीदा तरी आपल्या निर्णयात बदल केलेत. लॉक डाऊन सुरू होण्याच्या आधी विदेशात अडकलेल्या किती तरी लोकांना भारताने मायदेशी आणलं. मुळात हा आजार विदेशातून आलाय शे पाचशे लोकांनी आणला असेल आता त्याची संख्या पन्नास हजारच्या घरात पोहचली आहे. 

विमानतळावर आवश्यक उपाययोजना करू शकले नाही जे बाहेरून येत होते त्यांचं स्क्रिनिंग बऱ्याच उशिरा सुरू केलं तोपर्यंत आजार पसरत गेला. मारिन ड्राइव वरून धारावीत दाखल झाला.भारतीय विमानसेवा केंद्र सरकारच्या आखतारीत येते त्यामुळे देशाच्या या अवस्थेला नक्किच केंद्र सरकार जबाबदार आहे,त्याची झळ सर्वात अधिक देशातील गरीब वर्गाला पोचत आहे.अनेक मजुरांना कडून रेल्वे तिकीट घेण्यात आलय पण विमानातून मोफत कोरोनाबधित लोकांना आणलं गेलं.

दुसऱ्या देशातून कोरोनाबधित मोफत आणता आले पण गरीब मजुरांना मात्र सव्वा महिन्यापासून तडफडत जगवल सरकारने. ना मजुरी, ना पैसे, ना पाणी, ना जेवण फक्त एकच आस आपल्या घराची पण त्यातही एकवाक्यता नाही. काही मजूर ट्रेन नि घरी गेले तर काही अजूनही पायी मार्गक्रमणा करत आहेत. ८००/१००० किलोमीटर पायी निघाले तापमान ४५ डिग्री च्या आसपास, डोक्यावर सामानाचे ओझे पण ए. सी मध्ये बसून विडिओ मिटिंग घेणार्यांना याचे काही भान नाही. 

आपत्ती कोणतीही येऊ दे याची झळ बसणार या वर्गालाच. एवढे हाल केलेत मजुरांचे की आता ठेकेदारांना कामासाठी मजूर मिळणे शक्य होणार नाही.एवढी वाईट स्थिती होणार देशाच्या अर्थव्यवस्थेची की पुढे सरकार आर्थिक आणीबाणी ची तयारी करणार?? याची पण झळ या देशाच्या नागरिकांना च बसणार.आणखी किती महिने लॉक डाऊन ठेवणार??? या लॉक डाऊन ला जबाबदार तो मजूर तर नाही ना जो १०००किलोमीटर पायी आपल्या घराकडे गेला??

तो लहान दुकानदार नाही त्याच दुकान बंद आहे पण कर्जाचा हफ्ता व्याजासह भरावाच लागत आहे.सरकारच्या विचारांची कीव करावीशी वाटते जीवनावश्यक वस्तू सोबत दारूचे दुकान सुरू केले आणि जीवनाला दारू आवश्यक आहे या थाटात लोकांनी तिथे गर्दी करून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला. लोकांना खायला मीठ भाकरीची वानवा आहे आणि हे लोकांना दारू पाजायला निघाले आहेत.किती विषम विचार हे??

हा देश गरीबांनी चालतो, देश मजुरांनी घडवल्या जातो पण या लॉक डाऊन ने सर्वात जास्ती हाल केले या वर्गाचेच. या वर्गाचं पुर्नवसन केलं नाही तर हा वर्ग देश पेटवल्याशिवाय राहणार नाही.या वर्गाला तातडीच्या मदतीची गरज आहे त्यासाठी ६५ हजार कोटींची गरज आहे असं रघुराम राजन यांनी देखील सांगितलं आहे. 

देशातील पुढील काळ अराजकतेचा आहे आणि त्यासाठी जबाबदार केंद्र सरकारची विषम नीती आहे जी श्रीमतांसाठी सहानभूती ची आहे आणि गरीबांसाठी अन्यायाची..!लेखिका -नम्रता ठेमस्कर, चंद्रपूर -या स्वतंत्र राजकीय विश्लेषक आहेत