चंद्रपुरात बांधकाम मजुरांचा उद्रेक!Migrant Workers in Chandrapur come out on road demanding basic needs and salaries during lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात बांधकाम मजुरांचा उद्रेक!Migrant Workers in Chandrapur come out on road demanding basic needs and salaries during lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

आज दिनांक 2 मे कामगार दिनाच्या दुसऱ्या दिवशीच चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या बांधकाम मजुरांचा आज उद्रेक पाहायला मिळाला. शेकडोंच्या संख्येने हे मजूर जमून आपल्या पगाराची मागणी करत स्वगावी जाण्यास उठून निघाले. 

  मजुरांची शेकडोची संख्या व रस्त्यावर ठिय्या देत बसलेले घोळके बघून वेळीच पोलीस प्रशासनाने त्यांची समजूत काढली आणि मोठा अनर्थ टळला.

सविस्तर माहिती नुसार  चंद्रपूर शहरातील बायपास रोड वर  पागल बाबा चौक येथे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहारचे मजूर शेकडोंच्या संख्येने कामावर होते. अशातच लॉकडाउन झाले आणि हे मजूर येथेच अडकले. या सर्व मजुरांची व्यवस्था करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती. मात्र, त्याने या मजुरांना वाऱ्यावर सोडत पळ काढला. 

त्यामुळे या मजुरांना दोन वेळचे जेवन मिळणे देखील मुश्किल झाले. हे मजूर मोठ्या हलाकीचे जीवन जगत होते. काल मजुरांसाठी छत्तीसगड साठी ट्रेन धावली असल्याचे या मजुरांच्या लक्षात आले. त्यामुळे मजुरात उद्रेकांची ठिणगी पडली. 

आम्हीही आता मिळेल त्या साधनाने परत जाऊ असे म्हणत हे मजूर शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या गावाकडे प्रस्थानही केले. मात्र, वेळीच पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने त्यांची समजूत काढण्यात आली. 


यावर तोडगा काढण्यासाठी मजुरांचे काही प्रतिनिधी आणि कंत्राटदारांना चर्चेसाठी रामनगर पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. यात जो अंतिम तोडगा निघणार त्यानुसार त्यांना योग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे  - श्री. दौंड, तहसीलदार, चंद्रपूर