पुरवठा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर :मिलिंद अँग्रीकल्चरल सर्व्हिसेस , राजुरा तर्फेशेतकरी गटांना बंधावर बियाणे , खत व कीटकनाशके पुरवठा मोहीम सण २०२०-२१ #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुरवठा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर :मिलिंद अँग्रीकल्चरल सर्व्हिसेस , राजुरा तर्फेशेतकरी गटांना बंधावर बियाणे , खत व कीटकनाशके पुरवठा मोहीम सण २०२०-२१ #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर मिलिंद अँग्रीकल्चरल सर्व्हिसेस , राजुरा मार्फत तालुक्यातील शेतकरी गटांना बंधावर बियाणे , खत व कीटकनाशके पुरवठा मोहीम सण २०२०-२१ अंतर्गततालुका कृषी अधिकारी राजुरा  मंडळ कृषिअधिकारी देवाडा, यांच्या समन्वयाने परिवर्तन शेतकरी बचतगट, कोष्टाळा यांना बांधावर खत वितरण करण्यात आले.

सदर वितरण मोहीम ला मान्यवरांनी हिरवा झेंडा दर्शविला.सदर कार्यक्रमात मा.रवींद्र भोसले (विभागीय सहसंचालक नागपूर), मा. डॉ. उदय पाटील ( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर), मा. गोविंद मोरे (उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा), मा. रवींद्र धमाल (तालुका कृषी अधिकारी कोरपना), मा. गुलाब कउलग ( तालुका कृषी अधिकारी राजुरा ), मा. वि. मकपल्ले (मंडळ कृषी अधिकारी राजुरा) मा. चेतन चव्हाण (मंडळ कृषी अधिकारी देवडा), मा. प्रवीण मोहुर्ले (कृषी पर्यवेक्षक), मा. तुळशीराम आडे ( कृषी पर्यवेक्षक) ,मा. संदीप दातारकर, मा. किशोर चंदन वाटवे , मा. परमेश्वर खिल्लारे, मा. सुधीर यादवराव धोटे ( संचालक मिलिंद अग्रिकल्चर सर्व्हिसेस) सदाशिव आदे (अध्यक्ष परिवर्तन शेतकरी बचत गट) व इतर मान्यवर उपस्थित होते.


दरम्यान ऍड. यादवराव धोटे मेमोरीलयल सोसायटी द्वारे कोविड-१९ या संकटाशी आज सर्व जग लढत आहे . कोविड - १९ ची भीषणता आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेता , यावर प्रतिकारात्मक उपाय म्हणून तोंडाला मास्क लावणे आणि हात धुणे महत्वाचे आहे. यात  महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून मास्क तयार केले आहेत.
      


जगाचा पोशिंदा शेतकरी यांना सुरक्षित ठेवण्याकरिता व शेतकऱ्यांना कोविड - १९  या जगतव्यापी संकटाशी लढा देण्याकरिता , प्रतिकारात्मक उपाय योजना म्हणूनपरिवर्तन शेतकरी बचत गट कोष्टाळा यांना १०० मास्क ऍड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा तर्फे मा. सुधीर यादवराव धोटे (अध्यक्ष ऍड. या. धोटे मे. सो. ) मार्फत  देण्यात आले आहे.