वैनगंगा नदीपात्रात बुडून प्राध्यापक व मित्राचा मृत्यू : कोरोनाच्या जिल्हाबंदीत चोरटा मार्ग ठरला घात मार्ग #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वैनगंगा नदीपात्रात बुडून प्राध्यापक व मित्राचा मृत्यू : कोरोनाच्या जिल्हाबंदीत चोरटा मार्ग ठरला घात मार्ग #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी - 

देशात कोरोनाचे सावट असल्याने राज्यात संचारबंदी लागू केली असल्याने जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद आहेत. कर्मचाऱ्यांनाही  मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत. अशा परिस्थितीत अनेक जण नदी पात्राच्या चोरट्या मार्गाचा ये-जा करण्याकरिता अवलंब करीत आहेत. 

अशातच निलज येथील ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक पदावर असलेले पद्मनाथ मडावी व संजय उके यांना चंद्रपूर जिल्हा ओलांडून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या घाईत ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा (पिंपळगाव) येथील वैनगंगा नदी पात्रात महाविद्यालयीन प्राध्यापक व मित्राचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 13  मे ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

प्रा.पद्मनाथ तानबाजी मडावी (वय 41 वर्ष) व संजय उके (वय 40 वर्षे) असे मृतकांची नावे आहेत. हे ब्रम्हपुरी येथे रूम करून राहतात. त्यांचे कुटुंब गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील चोप (कोरेगाव) येथे असल्याने ते मुलांच्या व पत्नीच्या भेटीकरिता अधेमधे या मार्गाने जायचे कोवीड 19  यासंदर्भात सर्वेक्षण करायचे असल्याने ब्रम्हपुरी ला पोहोचणे करिता पद्मनाम मडावी हे कुरुड येथील संजय उके या मित्राला घेऊन कोंडाळा ते खरकाडा या नदीपात्रातून नावेने प्रवास केला व खरकाडा या घाटावर पोहोचल्यानंतर दोघेही आंघोळी करीता गेले.

पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. फोन उचलत नसल्याने दोघांचीही शोधाशोध घेतली असता खरकाडा येथील वैनगंगा नदी पात्रात दोघांचेही मृतदेह आढळून आले याची ब्रम्हपुरी पोलिसात तक्रार करण्यात आली.

प्रा. मडावी यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगी व दीड वर्षाचा मुलगा भाऊ, बहिणी असा बराच आप्तपरिवार आहे तसेच कुरुड येथील संजय उके यांच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ब्रम्हपुरी पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करीता ब्रम्हपुरी.पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस ठाणे  करीत आहे .
-