अखेर वर्धा व गडचिरोली येथे अडकलेले चंद्रपूरकर जिल्ह्यात परतले #lockdown-movements - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर वर्धा व गडचिरोली येथे अडकलेले चंद्रपूरकर जिल्ह्यात परतले #lockdown-movements

Share This
◾️आ.सुधीर मूनगंटीवार यांच्या स्वखर्चातून ब्रिजभूषण पाझारे व राहुल पावडे यांचे यशस्वी नियोजन.
◾️दोन खाजगी ट्रॅव्हल्स चंद्रपूर करांसहित परतल्या सुखरूप.

खबरकट्टा / चंद्रपूर : 
                   
संचारबंदी मध्ये चंद्रपूर नजीक असलेल्या वर्धा व गडचिरोली जिल्ह्यतील प्रवाशांना मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या पुढाकारातून स्वजिल्ह्यात आणण्यात आले. वर्धा व गडचिरोली येथे अडकलेल्या विद्यार्थी, कामगार, व इतर नागरिकांना चंद्रपूर येथे आणण्याकरिता दोन ट्रॅव्हल्स पाठविण्यात आल्या व अडकलेल्या या आपल्या जनतेला आ.सुधीर मुनगंटीवार यांनी स्वजिल्ह्यात परत आणले.

             
यावेळी उपमहापौर तथा स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे ,जेष्ठ नेते डॉ. मंगेशजी गुलवाडे,मा. दत्तप्रसंना महादानी , मा.प्रकाश धारने,भाजयुमोचे सूरज पेदुलवार, प्रज्वलन्त कडू ,आदित्य डवरे, सत्यम गाणार, अक्षय शेंडे यांची उपस्थिती होती.

            
संपूर्ण देशात सुरु असलेल्या या संचारबंदी मुळे विविध भागात विद्यार्थी, मजुर, कामगार व इतर नागरीक पर जिल्हा व राज्यात अडकलेले आहे. अडकलेल्या आपल्या जनतेला परत आण्यास सुधीर मुनगंटीवार पुढाकार घेत आहे. तसेच त्यांचा पुढाकारातून स्वखर्चाने अविरत पणे सेवा देणे सुरूच आहे.वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी झालेली असून त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे.