अन पाहुणे अडकडले लग्नघरीच : जळकोट, जिल्हा - लातूर ते कोरपना, जिल्हा - चंद्रपूर #lockdown-effect - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अन पाहुणे अडकडले लग्नघरीच : जळकोट, जिल्हा - लातूर ते कोरपना, जिल्हा - चंद्रपूर #lockdown-effect

Share This
◾️प्रशासनाच्या परवानगीची प्रतिक्षा 
◾️घराकडे जाण्याची लागली ओढ

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना- 

कोरोना मुळे देशभर संचारबंदी लागू करण्यात आली. कोरोना संचार बंदी पूर्वी लग्नासाठी आलेलं लातूर जिल्ह्यातील एक कुटुंब जिल्ह्यातील कोरपना येथे लग्न घरीच अडकले आहे.दीड महिना लोटून गेल्याने दोन्ही परिवाराची चिंता वाढली असून प्रशासनाच्या परवानगीची प्रतिक्षा त्यांना लागली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, कोरपना च्या इंदिरानगर येथील रहिवासी भगवान तोगरे यांचे घरी त्यांच्या मुलाचे लग्नकार्य होते. 

त्यानिमित्य राहणार जळकोट जिल्हा लातूर येथील नातेवाईक मंडळी सहकुटुंब त्यांच्या घरी आली होती. लग्न उरकले मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संचारबंदी लागू झाल्याने पाहुणे अडकले गेले. यानंतर त्यांना प्रशासनाने आरोग्य तपासणी करून 14 दिवस होम ˈक्वॉरन्टीन् केले. 

होम ˈक्वॉरन्टीन् चे दिवस पूर्ण झाले. त्यानंतर लॉकडाऊन चा दुसरा टप्पा ही सुरू झाला. प्रशासनाला अनेकदा विनंती अर्ज केले. मात्र आजवर त्यांच्या जाण्याचा प्रश्न कायम आहे. 

तोगरे यांचे मोलमजुरी करून जगणारे कुटुंब आहे. त्यांच्या घरात आधीच आठ जण आहे. वरून लग्नाचं घर आणि त्यात 14 पाहुण्यांची भर त्यांच्यावर येऊन पडली आहे. जेमतेम दोन खोल्यात त्यांचा रहिवास आहे. अशा स्थितीत ऐन अडचणीच्या काळात पाहुण्यां च्या व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. 

रोजगार धंदा ही बंद असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. पाहुणेमंडळी शेतमजुरी करणारे असल्याने त्यांनाही त्यांच्या घराची शेतीची गुरा वासराकडे बघण्याची ओढ लागली. त्यांच्याही घर,शेतीकडे कोणी बघायला नसल्याने ते चिंतेत आहे. त्यामुळे त्यांना त्वरित प्रशासनाने परवानगी उपलब्ध करून देऊन जाण्याची सोय करावी अशी अपेक्षा त्यांनी टीम    खबरकट्टा सोबत बोलताना व्यक्त केली.