*चंद्रपूर ब्रेकिंग : दारूची ऑनलाईन डिलिवरी? #liquor-sell-at-chandrapur-online-by-facebook-page-is-found-fake - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

*चंद्रपूर ब्रेकिंग : दारूची ऑनलाईन डिलिवरी? #liquor-sell-at-chandrapur-online-by-facebook-page-is-found-fake

Share This
घरपोच डिलीवरी नावाखाली फसवणुकीची जाहीरात  : सुज्ञ वाचकांमार्फत हे फसवणूक करणारे फेसबुक पेज आढळून आल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांना तात्काळ या प्रकरणाची माहिती  " टीम खबरकट्टा "ने देत कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
 



खबरकट्टा / चंद्रपूर : सतर्क -

कोरोना विषाणुमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सर्व नागरीकांना यांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आदेश आहे. नागरीक हे आपआपल्या घरात बसुन इंटरनेटच्या माध्यमातुन सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणामध्ये वापर करीत असुन इतरही ऑनलाईन सेवा घेत आहेत. परंतू इंटरनेटच्या माध्यमातुन काही ठगवा / फसवणुक करणारे इसम सोशल मिडीयाचा दुरुपयोग करुन आर्थिक फसवणुक करीत असल्याचे पोलीस विभागाचे निर्दशनास आले आहे.

मागील काही दिवसापासुन फेसबुक या सोशल मिडीयावर call me home delivery अशा प्रकारे जाहिरात देवून त्याठिकाणी दारुच्या बॉटलचे फोटो व मो.क्र.९१०११९८०७८,९७८३९४०७६८,९९८२८५२९६४ अशाप्रकारे नमुद केलेले आहेत. सुज्ञ वाचकांमार्फत हे फसवणूक करणारे फेसबुक पेज आढळून आल्यावर टीम खबरकट्टा मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांना तात्काळ या प्रकरणाची माहिती टीम खबरकट्टा ने देत कार्यवाही करण्याची मागणी केली होती. 

पोलीसांनी या क्रमाकांची प्राथमिक स्तरावर पडताळणी केलेली असता,
सदर क्रमाक हे बाहेरील राज्यातील असुन बाहेरील राज्यातुन ऑपरेट होत असल्याचे आढळुन आले आहे. चंद्रपुर जिल्हयामध्ये अशाप्रकारे होम डिलीवरी कोणतीही शक्यता नाही. 

उलट तुमची फसवणुकचीच दाट शक्यता आहे. आपण ग्राहक म्हणुन या क्रमांकावर फोन केल्यास आपणास काही पैसे सुरवातीला दयावे लागतील व उर्वरीत पैसे डिलीवरी झाल्यानंतर, असे सांगण्यात येते.

परंतू हे सर्व बनावट असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये आढळून आललेले आहे. तरी सर्व नागरीकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, सोशल मिडीयावरील अशाप्रकारच्या फसव्या जाहीरातवर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये. 

खात्री पटल्याशिवाय ऑनलाईन पेमेंट करुन नये, तसेच मोबाईल फोनवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आपल्या बँक अकाउटचे डिटेल शेअर करु नये. अशाप्रकारे ऑनलाईन फॉड/काल पासुन सावध रहावे, असे आवाहन चंद्रपुर पोलीसांकडुन करण्यात येत आहे.