जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांचा कोरपना तालुक्यात दौरा :कोरपना पंचायत समिती येथे विकास कामांचा आढावा #korpna - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांचा कोरपना तालुक्यात दौरा :कोरपना पंचायत समिती येथे विकास कामांचा आढावा #korpna

Share This
◾️तालुक्यातील विविध गावातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण
◾️नारंडा येथील विकासात्मक कामांचा आढावा

 खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -
  
चंद्रपुर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्याच्या दौरा केला असून  यामध्ये प्रामुख्याने कोरपना पंचायत समितीला भेट देऊन गट विकास अधिकारी पाचपाटील यांच्याशी तालुक्यातील विविध विकासात्मक मुद्यावर चर्चा केली,तसेच कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर सरपंच,पोलीस पाटील,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात यावा.
    
तसेच ग्रामसेवक हे कोरोना काळातही मुख्यालयी राहत नसून कोरोना सारख्या विश्वसंकटातसुद्धा त्यांची कामगिरी सुमार आल्याबाबत नाराजी व्यक्त केली.तसेच यापुढेही असाच प्रकार सुरू असल्यास आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे कार्यवाही करू असे सभापती सुनील उरकुडे यांनी सांगितले.
       
तसेच कोरपना तालुक्यातील हेटी, कोडशी (खुर्द), शेरज(बु),शेरज(खुर्द) इत्यादी गावांना भेटी देऊन तेथिल नागरिकांना मास्क व सानिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील नागिरकांना कोरोना बद्दल जनजागृती करून माहिती देण्यात आली.तसेच आपण सामाजिक अंतराचे पालन केले पाहिजे.व दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आले नाही पाहिजे अशी माहिती यावेळी गावातील विविध नागरिकांना देण्यात आली.तसेच नारंडा गावात भेट देऊन विकासात्मक बाबींचा आढावा घेतला.

नारंडा येथील तलाव खोलीकरण झाले त्याच्या  सौंदरीकरण साठी आपण प्रयत्न करू तसेच नारंडा ते शेरज खुर्द पांदण रस्त्याचे बांधकाम सुरू असून तेथिल नाल्यावर पूल बांधणे, नारंडा येथे  नवीन पशुवैद्यकीय रुग्णालय मंजूर करणे व नारंडा येथील पोचमार्गाचे डांबरीकरण असेल आपण यासर्व बाबींसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करू असे यावेळी सभापती सुनील उरकुडे यांनी सांगितले.
   
यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,शक्ती केंद्र प्रमुख सत्यवान चामाटे, शेरज (बु) सरपंच बालभारती जरिले, कोडशी सरपंच टोंगे पाटील,नारंडा उपसरपंच अनिल शेंडे,नारंडा पोलीस पाटील नरेश परसुटकर,प्रवीण हेपट,जगदिश जरिले,विनोद टोंगे,गजू बोर्डे,रवी मडावी,विजय बोर्डे,विवेक वडस्कर,दशरथ बोंडे,संतोष हुलके, ज्ञानेश्वर महात्मे इत्यादी उपस्थित होते.