लॉकडाऊन मध्ये लग्नाऐवजी सनदी अधिकाऱ्याने केले हे : वाचा चंद्रपूर जिल्ह्यातील हा सनदी अधिकारी कोण? #IFS PROUD - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लॉकडाऊन मध्ये लग्नाऐवजी सनदी अधिकाऱ्याने केले हे : वाचा चंद्रपूर जिल्ह्यातील हा सनदी अधिकारी कोण? #IFS PROUD

Share This
हे आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सनदी अधिकारी श्री.राहुल पाटील त्यांचे 2 मे ला लग्न होते. पण कोरोनाच्या संकटामुळे आजच्या तारखेला लग्न करणे शक्य नसल्याने संकटात असलेल्या आपल्या राज्यासाठी सरांनी एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी केली आहे.

खबरकट्टा / चंद्रपूर : 

कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे एरव्ही मुहूर्तावर लग्न करणे अशक्य असल्याचे लक्षात येताच येथील आयएफएस (भारतीय वन सेवा) अधिकारी राहुल पाटील व त्यांच्या भावी वधू तेजस्विनी साळुंखे यांनी लग्नाच्या खर्चासाठी ठेवलेली 1 लाख रुपयांची रक्कम लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशी शनिवार दि. 2 मे रोजी मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

राहुल पाटील हे तरुण अधिकारी चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील आहे. लॉकडाऊनपूर्वीच त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किवळ येथील तेजस्विनी साळुंखे यांच्याशी जुळला. तेजस्विनीचे शिक्षण एमबीए झालेले असून त्या वन अंब्रेला नावाने मुंबईमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करीत आहेत. दरम्यान त्यांचा साक्षगंधही थाटात पार पडला होता. 

त्यानंतर 2 मे ही लग्नाची तारीख निश्चित झाली. लग्नाची तयारी सुरू असतानाच जगावर कोरोनाचे संकट आले. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला. यावर मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्याने सर्वकाही एकाएकी ठप्प झाले. याचा फटका लग्न सोहळ्यांनाही बसला. अनेकांना आपले लग्न आटोपते घ्यावे लागत आहे. राहुल पाटील यांच्याही लग्नाला ही अडचण आली. ते चंद्रपुरात आणि त्यांची भावी वधू ही सातारा जिल्ह्यातील. यामुळे त्यांना २ मे च्या मुहूर्तावर लग्न करता येणे अशक्य आहे. हे लक्षात येताच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपायचे ठरवले. 

याच पार्श्वभूमीवर त्यांनी लग्नाच्या पहिल्या मुहूर्ताची आठवण राहावी म्हणून स्वत: आणि त्यांच्या भावी वधू यांनी प्रत्येकी 50 हजार रुपये असे एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला. 

दोघांनीही काल 2 मे रोजी ही रक्कम नेटबँकिंगच्या आधारे मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यात जमा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला. प्रत्येक नव वरवधूने किमान एक हजार रुपये जरी मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्यास याची राज्याला मोठी मदत होईल, असे असे राहुल पाटील व त्यांच्या भावी वधू तेजस्विनी साळुंखे यांचे म्हणणे आहे.

याशिवाय सांगली,सातारा परिसरात अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जवळपास ७०० मास्क व ७००लिटर सॅनिटायझरचे वाटप केले आहे.आणि विशेष म्हणजे तेथील बांबूवर आधारित व्यवसाय धोक्यात आल्यामुळे यासाठी 'वर्क फ्रॉम होम फॉर बांबू' ही संकल्पनाही राबवली आहे.

आपल्या राज्यात जगाला हेवा वाटावा असे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो अश्या अनेक प्रतिक्रिया समाज माध्यमातून अनेकांनी दिल्या आहेत.