विधवेला जागेच्या वादावरून शेजाऱ्याकडून बेदम मारहाण चनई बु येथील घटना ; चार आरोपीस अटक #halfmurder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विधवेला जागेच्या वादावरून शेजाऱ्याकडून बेदम मारहाण चनई बु येथील घटना ; चार आरोपीस अटक #halfmurder

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना - 

तालुक्यातील चनई बू येथे एका विधवा महिलेला शेजारच्या कुटुंबियाकडून कुटुंबियांकडून जागेच्या वादावरून बेदम मारहाण करण्यात आली.ही घटना शनिवारी घडली.

प्राप्त माहितीनुसार, प्रेमिला कुमरे वय 30 या शेतमजुरीचे काम करतात. पतीचे छत्र हरवल्यानंतर दोन मुलांसह एकट्याच  राहतात.मात्र शनिवारी प्रेमिला या त्यांच्या जागेच्या ठिकाणी गेल्या असता जागेवरून वाद घालत कवडू मडावी, सिंधू मडावी, संदीप मडावी, वनमाला मडावी यांनी संगणमत करून लाठी काठी व लाथा बुक्क्यांनी   बेदम मारहाण केली. 

यामुळे प्रेमिला च्या डोक्याला गंभीर इजा झाली. तसेच हात व पाठीवर गंभीर जखमा झाल्या. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसानी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

तेथून तिला जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. डॉक्टर समक्ष महिलेच्या घेतलेल्या  बयानावरून कोरपणा पोलिसांनी अप क्र.99/20 नुसार कलम 324, 325,307, 34 भांदवी नुसार गुन्हा दाखल केला. 

कोरपना पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण गुरूनुले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वासनिक व कोरपना पोलीस करीत आहे.