चंद्रपूर सहित इतर काही जिल्ह्यात राशन कार्ड देणे सुरु करा - उच्च न्यायालयाचे राज्य सरकार ला निर्देश #Govt issues order to provide ration cards within area including chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर सहित इतर काही जिल्ह्यात राशन कार्ड देणे सुरु करा - उच्च न्यायालयाचे राज्य सरकार ला निर्देश #Govt issues order to provide ration cards within area including chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मुंबई -
आदिवासी विभागातील पात्र नागरिकांना रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले. 

ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव, नंदुरबार, नागपूर, धुळे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारदरा, गोंदिया, यवतमाळ, मेळघाट आणि किनवट या जिल्ह्यातील आदिवासी भागातील नागरिकांना अन्नधान्य व अन्य मूलभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका विवेक पंडित यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. 

या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना अन्नधान्य, वैद्यकीय मदत व अन्य मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे मुले आश्रमशाळते जात आहेत, अशी माहिती पंडित यांचे वकील नितीन प्रधान यांनी न्यायालयाला दिली.

त्यावर सरकारी वकील पी. ए. काकडे यांनी पालघर जिल्ह्यात रेशनकार्डधारकांना, कार्ड नसलेल्यांना शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे. त्यासाठी एनजीओचीही मदत घेण्यात येत असल्याचे न्यायालयाला सांगितले. 1000छोट्या उद्योगांमध्ये 12, 500 रोजगार काम करतात, अशी माहिती सरकारने न्यायालयाला दिली.