वाटपासाठी नेणारा तांदूळ सूडबुद्धीने पकडला : वाहन चालकासह पत्रकारांवरील गुन्हे परत घ्या ; पत्रकार संघटनेची मागणी #gondpipari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाटपासाठी नेणारा तांदूळ सूडबुद्धीने पकडला : वाहन चालकासह पत्रकारांवरील गुन्हे परत घ्या ; पत्रकार संघटनेची मागणी #gondpipari

Share This
◾️वाटपासाठी नेणारा तांदूळ सूडबुद्धीने पकडला
◾️गरजूंना मदतीचा मार्ग संधीसाधूनी अडविला
◾️सामाजिक संवेदना ओसरली
◾️वाहन चालकासह पत्रकारांवरील गुन्हे परत घ्या 
◾️गोंडपिपरी पत्रकार संघटनेची मागणी

खबरकट्टा /चंद्रपूर : गोंडपिपरी -

कोरोना विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार माजला.अवघे जनजीवन विस्कळीत झाले.यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांची वाताहत झाली.अश्यातच अनेक हातही मदतीसाठी समोरही आले.याच दरम्यान गोडपिपरी तालुका पत्रकार संघ आणि तालुका काँग्रेस कमेटीच्या (अल्पसंख्याक विभाग) वतीने गरिब,गरजूंना वितरणासाठी जाणारे साहित्य रस्त्यातच अडविण्यात आले.अन याचे भांडवल करण्यात आले.संधीसाधू राजकारण्यांकडून हा निंदनीय प्रकार गोंडपिपरीत सोमवारी घडला.

सदर घटनेत वाहन चालकासह पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यानंतर संतप्त झालेल्या गोडपिपरी तालुका पत्रकार संघ आणि तालुका काँग्रेस कमेटीच्या (अल्पसंख्याक विभाग) पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आपले स्पष्टीकरण दिले.वाहन चालकासह पत्रकारांवर लादलेले गुन्हे परत घेण्याची मागणी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.

सद्या कोरोना विषाणूने सर्वत्र कहर माजविला आहे.सार काही जागच्या जागी थांबलेलं आहे.लॉकडाउन सुरू असल्याने अनेक कुटुंबियांची फरफट असल्याचे चित्र आहे.दैनंदिन मोलमजुरी करणाऱ्याची चांगलीच पंचायत आहे.या स्थितीत गरजूंच्या मदतीसाठी अनेक हात समोर आले.दानकर्ते आपापल्या पद्धतीने मदत करत आहेत.यात  गोंडपिपरी येथील पत्रकार देखील सामाजिक बांधिलकी जोपासत अडल्यांना जेवण देत आपले कर्तव्य पार पाडले.

एवढंच नाही तर सोशल मीडियावर संदेश देत गरजूंना आवश्यकते वेळी जेवण देण्याचा मेसेज त्यांनी अनेक ग्रुप वरती वायरल केला. अशातच गोडपिपरी तालुका पत्रकार संघ आणि तालुका काँग्रेस कमेटीच्या (अल्पसंख्याक विभाग) पदाधिकाऱ्यांनी तांदळासोबतच जिवनावश्यक बाबी वितरणाचे नियोजन आखले.यासाठी सोमवारी साहित्य वितरणासाठी किट नेत असतांना संधीसाधू राजकारण्यांनी याचे भांडवल केले.आणि गाडी मधेच अडवली.

लागलीच तहसिल कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.आणि कुठलीच शहानिशा न करता वाहनचालक आणि पत्रकारांवर गुन्हे दाखल करून यंत्रणा मोकळी झाली.वास्तविकता सदर वाहनातील तांदूळ हे तालुक्यातील काही गावात कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गरीब,गरजूंना वितरणासाठी नेल्या जात होता.या संदर्भात त्या त्या गावच्या संबंधित लाभार्थ्यासह संपर्कातील व्यक्तींना वितरणाची कल्पना दिल्या गेली होती.मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे गरजूंच्या तोडचा घास हिरावला.

अश्यातच कोरोना या जिवघेण्या विषाणूचे सर्वत्र थैमान सुरू असतांना कुठल्याही लोभाची अपेक्षा न करता,जीव धोक्यात घालून शेतकरी,कष्टकरी आणि मजुरांच्या व्यथा शासनासमोर मांडणाऱ्या व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून अविरत समाजाची सेवा करणाऱ्या पत्रकारांवर असले बिनबुडाचे आरोप करून बदनामी करण्याचे षडयंत्र येथील काही राजकारण्यासह समाजकंटकांकडून सुरू आहेत.यासाठी देखिल तालुक्यातील पत्रकारांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.
 
सदर कार्यवाहीत झालेल्या वाहन चालकासह पत्रकारांवरील गुन्हे परत घेण्यात यावे या मागणीला घेत तालुका पत्रकार संघ आणि तालुका काँग्रेस कमेटीच्या (अल्पसंख्याक विभाग) पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार सिमा गजबिये आणि ठाणेदार संदिप धोबे यांची भेट घेत निवेदन दिले आहे.