गडचांदूरात नरेश टॉकीज येथे जुगार : खुद्द मालक व नगरसेवक रंगेहाथ अटकेत : इतरही बड्या असामी - प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबाव : सूज्ञ नागरिकांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना केला वास्तव प्रकरणाचा ई-मेल! ##gambling-at -gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूरात नरेश टॉकीज येथे जुगार : खुद्द मालक व नगरसेवक रंगेहाथ अटकेत : इतरही बड्या असामी - प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबाव : सूज्ञ नागरिकांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना केला वास्तव प्रकरणाचा ई-मेल! ##gambling-at -gadchandur

Share This
गडचांदूरात उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात केली कारवाई !
◾️जूगार कायद्यातंर्गत करण्यात आलेल्या कारवाईत बड्या आसामींचा समावेश !
◾️बड्या आसामींना बाहेर काढण्यासाठी पोलिस विभागावर राजकीय दबावतंत्राचा वापर करण्याचा जिल्ह्यातील नेत्यांचा प्रयत्न!
◾️पोलिस अधिक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांना वेग!
◾️दुपारी केलेल्या कारवाईची माहिती, वरिष्ठांना सादर करण्यास विलंब ! 
◾️सूज्ञ नागरिकांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना केला वास्तव प्रकरणाचा ई-मेल!

खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -

गडचांदूर नगर पालिकेतील शिवसेनेचे गटनेते सागर ठाकूरवार ह्यांना इतर 5 सहकाऱ्यांसह जुगार खेळताना उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार ह्यांच्या नेतृत्वात टाकलेल्या धाडीत रंगेहात अटक करण्यात आली असुन खेळण्यासाठी वापरण्यात आलेले 52 पत्ते, 3300 रुपये रोख, 5 मोबाईल व 5 दुचाकींसह एकुण 165375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक माहिती नुसार,  गडचांदूर नगर पालिकेतील शिवसेनेचे गटनेते सागर ठाकुरवार, रतन नकुलवार, शंकर क्षीरसागर, गणेश सातपाळी, गणेश कोल्हे, राजेश महाडोळे हे सहाही लोक वॉर्ड क्रमांक 4 मधिल नरेश टॉकीजच्या वरच्या माळ्यावर असलेल्या खोलीत जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार ह्यांना मिळाली असता त्यांनी आपल्या चमूसह गडचांदूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक चौधरी, ए. एस आय अन्सारी, पोशी लिंगेवान ह्यांच्या सहकार्याने धाड घालुन पैसे लाऊन तीन पत्यांचा जुगार खेळत असताना रंगेहात अटक केली असुन त्यांच्याकडून एकुण 165375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई जुगार कायदा कलम 4, 5 तसेच भांदवी च्या सहकलम 188, 269 (22) अन्वये संचारबंदी मोडणे, बेकायदा जमाव करणे ईत्यादी कायद्यान्वये कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या ठिकाणी शहरातील काँग्रेस,  भाजपा व शेतकरी संघटनेचे नेते असलेले  व्यापारी सुद्धा उपस्तित जुगार खेळत असल्याचे व ते पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे गडचांदूर शहरात चर्चेत आहे.