बिग ब्रेकिंग : चंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण !#first corona positive case found in chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकिंग : चंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण !#first corona positive case found in chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :. 


आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असून चंद्रपूर येथील कृष्णनगरातील 50 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

हा कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण कोरोना आयसोलेशन वॉर्ड मध्ये भरती असून प्रकृती स्थिर आहे. त्याला दमा व खोकल्याचा त्रास होता असे सांगण्यात येत असून सुरुवातीला न्युमोनियाचाही त्रास होत असल्याची लक्षणें आढळली असल्याचे कळते. 

या रुग्णाचा पूर्व इतिहास काय आहे, तो प्रवास करून आलेला आहे की इतर काही याबाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. त्याचा थ्रोट स्वॅब नागपूरला पाठवला होता. त्याचा शनिवारी निकाल पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉक डाऊन पाळावे, असे आवाहन केले आहे. नागपूर विभागात नागपूर, भंडारा पाठोपाठ आता चंद्रपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. विभागात वर्धा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही.
        
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी सायंकाळी साडेआठ वाजता 50 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटिव निघाला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला.

उद्यापासून महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.