आता विना शिधापत्रिकाधारकांना सुद्धा मिळणार : राजेंद्र मिस्कीन : मोफत तांदूळ व चना 🔵 पात्र लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध होणार 🔵 लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे धान्य वितरण दुकानाची माहिती देण्यात येणार #Dso-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आता विना शिधापत्रिकाधारकांना सुद्धा मिळणार : राजेंद्र मिस्कीन : मोफत तांदूळ व चना 🔵 पात्र लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध होणार 🔵 लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे धान्य वितरण दुकानाची माहिती देण्यात येणार #Dso-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि.31 मे: 

ज्या कुटुंबाकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेअंतर्गत कोणतीही शिधापत्रिका नाही, ज्यांना अन्नधान्याची गरज आहे असे सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्बल, विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर अशा गरीब व गरजु शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना माहे मे व जून, 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरिता प्रति व्यक्ती प्रति माह 5 किलो तांदूळ मोफत वितरीत करण्याचे निर्देश आहेत. तसेच शासन पत्र दिनांक 27 मे, 2020 नुसार या लाभार्थ्यांना प्रति कुटुंब 1 किलो अख्खा चना मोफत वितरीत होणार आहे.अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून, 2020 या दोन महिन्याच्या कालावधी करिता मोफत तांदूळ वितरीत करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक 19 मे, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्देश प्राप्त झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात उपरोक्त शासन निर्णयानुसार प्रत्येक गावनिहाय व शहरी भागात वार्डनिहाय संबंधित तहसील, नगरपालीका, महानगरपालीका यांच्याकडून गरजु व्यक्तींची यादी तयार करण्यात आली असून या यादीनुसार जिल्ह्यात 32 हजार 642 कुटुंबामधील 1 लाख 16 हजार 124 लाभार्थी व्यक्ती निश्चित करण्यात आले असून या सर्व लाभार्थ्यांना निश्चित केलेल्या स्वस्त धान्य दुकानातून जून महिन्यात मे व जून या दोन्ही महिन्याचे धान्य एकत्रितपणे म्हणजेच 10 किलो प्रति व्यक्ती तांदूळ व 2 किलो अख्खा चना प्रति कुटुंब या प्रमाणे एकदाच वाटप करण्यात येईल.

पात्र लाभार्थ्यांची यादी चंद्रपूर जिल्हयातील www.chanda.nic.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असून लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे त्यांना धान्य वितरीत करण्यात येणाऱ्या दुकानाची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी त्यांना निश्चित करुन दिलेल्या केंद्रावरून, स्वस्त धान्य दुकानातूनच धान्य प्राप्त करून घ्यावे लागेल. इतर केंद्रातून, स्वस्त धान्य दुकानातून त्यांना धान्य मिळणार नाही. निश्चित केलेल्या प्रत्येक केंद्र, स्वस्त धान्य दुकानामध्ये त्यांना जोडलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी धान्य घेण्यासाठी दुकानात एकाच वेळी गर्दी करु नये व मास्क घालून यावे. तसेच दुकानात सामाजिक अंतराचे पालन करावे. वरील धान्य वितरणासंबंधी नागरीकांच्या काही तक्रारी असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-22-4950 व 1967 या क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.