जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो अवश्य वाचा... यावर्षीच्या हवामानावर आधारित कृषी सल्ला #diochandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो अवश्य वाचा... यावर्षीच्या हवामानावर आधारित कृषी सल्ला #diochandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि.9 मे : 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील व कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी जमिनीची खोल नांगरणी करावी. त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडीच कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल तसेच शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रीय खत बनविण्यासाठी वापर करावा.

कोविड-19 या संसर्गजन्य आजारापासून रक्षण :

कोविड-19 या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यासाठी तोंडाला मास्क लावावे. शेतात काम करतांना लोकांमध्ये संपर्क टाळण्यासाठी 3 ते 5 फुट अंतर ठेवावे. समुदायामध्ये जवळजवळ एकतर येऊ नका. हात वारंवार साबणाने धूवून सॅनिटायझर वापरावे. शिंकताना व खोकलतांना तोंडावर रूमाल धरावे व स्वच्छता राखावी.

उन्हाळी धान - दाणे भरणे अवस्था:

तापमानाची वाढ लक्षात घेता मध्यम व उशिरा कालावधीत येणाऱ्या धान पीक वाणांची निशवण्यापुर्वी व निशवण्यानंतर 10 दिवस बांधीमध्ये 5 ते 7 से.मी. पाण्याची पातळी ठेवावे. धान पिकास पोटरी अवस्थेत पाण्याची कमतरता पडू देऊ नये. लवकर येणाऱ्या धान पीक वाणांची कापणीपूर्वी भेसळ लोंब्या (लाबोर) काढाव्यात. धान पिकात प्रति चुड 5 ते 10 तपकीरी तुडतुडे दिसताच त्यांच्या नियंत्रणासाठी मेटाराहझियम अनीसोपली ही जैविके 2.5 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावीत किंवा इमिडक्नोप्रोड 17.8, एस.एल.2.2 मि.ली. किंवा फिप्रोनील 5 एस.सी.20 मि.ली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी मुग- फुल व शेंगा अवस्था:

तापमानाची वाढ लक्षात घेता उन्हाळी मुग पिकाला आवश्यकतेनुसार हलके ओलीत करावे. केवडा रोग आढळल्यास रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. तसेच डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.ली. किंवा मिथाईल डिमेटोन 8 मी. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

 

उन्हाळी तीळ - फुल व बोंड्या अवस्था:

तापमानाची वाढ लक्षात घेता तीळ पिकाला आवश्यकतेनुसार हलके ओलीत करावे. उन्हाळी तीळ पीक फुलावर असतांना व बोंड्या धरायच्या वेळेस 2 टक्के डि.ए.पी. (200 ग्रॅम डि.ए.पी.+10 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करावी. पर्णगुच्छ (फायलोडी) रोगाच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. किंवा कार्बारी 10 टक्के पा.णी.भू. 40 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.

उन्हाळी भुईमूग शेंगावाढीची अवस्था:

उन्हाळी भुईमूगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करू नये आऱ्या जमिनीत जाण्याची वेळी ते शेंगा पोसण्याची कालावधीत पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तापमाणाची वाढ लक्षात घेता भुईमूग पिकाला आवश्यकतेनुसार हलके ओलीत करावे. उन्हाळी भुईमूगावरील तांबेरा आणि टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी टेंबुकोनॅझोल 25 टक्के डब्लू.जी. 500-750 ग्रॅम प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात (10-15 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी) मिसळून फवारणी करावी.

मिरची फळ वाढीची अवस्था:

तापमानाची वाढ लक्षात घेता मिरची पिकाला आवश्यकतेनुसार हलके ओलित करावे. मिरची पिकांवर चुरडा मुरडा या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील (5 इ.सी.) 15 मि.ली किंवा स्पिनोसँड (15 इ.सी) 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला पिके:

तापमानाची वाढ लक्षात घेता भाजीपाला पिकाला आवश्यकतेनुसार हलके ओलित करावे. तसेच पिकांमध्ये अच्छादनाचा वापर करावा, भाजीपाला पिकापासून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी मिरची, भेंडी, वांगे,काकडी, कारली, ढेमसे, कोहळ्याची लागवड करावी. भेंडी व टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी कारली, ढेमसे, कोहळ्याची लागवड करावी. भेंडी व टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 % ईसी 20 मिली अथवा नोव्हॅलिरॉन 10 टक्के ई.सी. 15 मिली अथवा क्लोरट्रॅनिलोपोल 18.5% एस. सी.3 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील व कृषि विज्ञान केंद्र सिदेवाही यांच्या कडुन करण्यात येत आहे.