शेतकऱ्यांनी जाणावे सोयाबीन शेतीचे तंत्रज्ञान: डॉ.उदय पाटील : जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी #diochandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकऱ्यांनी जाणावे सोयाबीन शेतीचे तंत्रज्ञान: डॉ.उदय पाटील : जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी #diochandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :आंतरपिक व दुबार पिक पध्दतीत सोयाबिन अतिशय उपयुक्त पिक आहे. पिकाच्या फेरपालटीमध्ये सोयाबीनचे महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतीचे तंत्रज्ञान जाणणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

नियोजनपूर्वक शेतीत सोयाबीन हे एक आशादायी पीक आहे. सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण 20 टक्के व प्रथिनांचे प्रमाण 40 टक्के आहे. खाद्यतेलात सोयाबीनला महत्वाचे स्थान प्राप्त झाले असून त्यामध्ये सोयाबीनचा मोठा वाटा आहे. सोयाबीन द्विदलवर्गी पीक असल्यामुळे त्याच्या मुळावरील गाठीत असणारे जिवाणू हवेतील नैसर्गिक नत्राचे स्थितीकरण करून पिकाच्या वाढीसाठी नज उपलब्ध करून देते.सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा (अवशेष) जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

हे आहे सोयाबीन शेतीचे तंत्रज्ञान:

लागवड तंत्र:हवामान:


सोयाबीनचे पिक 25 ते 33 अंश सेल्सीअस तापमानात चांगल्या प्रकारे वाढ शकते. ज्या भागात 700 ते 1000 मि.मी. दरम्यान पर्जन्यमान आहे. तेथे सोयाबीन उत्पादन चांगले येवू शकते.

जमिन:मध्यम भारी प्रतीची, उत्तम पाण्याचा निचरा होणारी, आम्ल-विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 पर्यंत असणारी जमिन या पिकाच्या वाढीस अतिशय उत्तम आहे.

पूर्व मशागत व भरखते: जमिनीची 15 ते 20 से.मी. खोल नांगरट 3 वर्षातून एकदा करून व 2 ते 3 वखराच्या पाळ्या देवून जमिन समपातळीत करावी. हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किया कंपोस्ट खत वापरून नंतर व्यवस्थित जमिनीत मिसळण्यासाठी वखराची पाळी दयावी. पेरणी पुर्वी 1 वखराची पाळी (जांभूळवाही) दिली असता तणांची तिव्रता कमी होते.

बिज प्रक्रिया: बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी कार्बाक्सीन 37.5 टक्के + थवरम 37.5 टक्के (मिश्र घटक) ची 75 टक्के डि.एस. ची 3 ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी.

जिवाणू खते: रायझोबियम जपोनिकम व पि.एस.बी. प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी प्रक्रिया करून नंतर जिवाणू खताची बिज प्रक्रिया करावी.

पेरणीची वेळ व पध्दत:

पुरेसा पाऊस (75 ते 100 मि.मी.) झाल्यानंतर जुनचा तीसरा आठवडा ते जुलैचा दूसरा आठवडा या दरम्यान पेरणी आटोपावी. 15 जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी होते.

पेरणी सरत्याने करावी, तीफणीचा वापर टाळावा. पेरणी करतांना पट्टा पध्दत वापरावी.सोयाबीनचे बियाने 4 से.मी. पेक्षा खोल पेरू नये अन्यथा बियाणे कुजून उगवण कमी होते.

2 आळीतील व रोपट्यामधील अंतर ३० x ८ से.मी. किंवा ४५ x ५ से.मी. ठेवावे, जेणे करून रोपांची संख्या हेक्टरी 4 ते 4.5 लाख ऐवढी राहील.उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी करावी.

रूंद वरंभा सरी पध्दतीत सोयाबिन पेरणी वरंब्यावर करण्यात येते दोन्ही बाजूने सरी पाडण्यात येते. कमी पर्जन्यमानात या सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साठून जमिनीत मुरते जमिनीत आलावा अधिक काळ टिकूण राहतो. तसेच अतिरिक्त पावसाच्या काळात या सऱ्यांमधून जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो. सोयाबिनला पाण्याचा ताण बसल्याने उत्पादनात घट दिसून येते. अशा वेळेस मुलस्थानी जलसंधारण फायद्याचे ठरते.

बऱ्याच वेळेस अधिक पाउस झाल्याने मध्यम ते भारी जमिनीत पाणी साचून पिकांचे नुकसान होते. त्यामुळे सोयाबिनसाठी रुंद वरंबा व सरी पध्दती (बीबीएफ) जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

मुलस्थानी जलसंधारण:

सोयाबिन पिकामध्ये अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत व मुलस्थानी जलसंधारणासाठी पेरणी नतर अंदाजे 30 दिवसांनी सोयाबीनच्या 3 ओळीनंतर सरी काढावी. सोयाबीन पिकाची पट्टा पध्दतीने (6 ओळ सोयाबीन व त्यानंतर 1 ओळ रिकामी) पेरणी केल्यास रिकाम्या ओळीत सरी पाडून मुलस्थानी जलसंवर्धन करता येईल.

बियाण्याचे प्रमाणः

किमान 70 टक्के उगवण शक्तीचे प्रति हेक्टर 75 किलो बियाणे वापरावे, स्वत: जवळचे बियाणे वापरायचे असल्यास घरच्या घरी उगवणशक्ती तपासून नंतरच पेरणी करावी.

खत व्यवस्थापन:

रासायनिक खतांची संपुर्ण खत मात्रा 30 किलो नत्र व 75 किलो स्फुरद व 30 किलो पालाश पेरणी सोबतच दयावीत. एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनेच्या दृष्टीने पेरणीपुर्वी प्रति हेक्टरी 5 टन चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दयावे. बियाण्यास जिवाणुखताची बिजप्रक्रिया करावी आणि पेरणी सोबत रासायनिक खताची अर्धी मात्रा 15 किलो नत्र, 37.5किलो स्फुरद व 15 किलो पालाश दयावे,

एकिकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यास मदत होते. माती परिक्षणानुसार आवश्यकता भासल्यास 30 किलो पालाशव्दारे व सुक्ष्म अन्नद्रव्य फवारणीतून अथवा जमिनीतून दयावे.