चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण : यवतमाळ येथून चंद्रपूरला आलेल्या मुलीचा अहवाल कोरोना पॉसिटीव्ह #coronapositive - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण : यवतमाळ येथून चंद्रपूरला आलेल्या मुलीचा अहवाल कोरोना पॉसिटीव्ह #coronapositive

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपुरात कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून  23 वर्षाच्या मुलीचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आल्याची खात्रीलायक माहिती आहे.  ही मुलगी 9 मे रोजी यवतमाळ येथून चंद्रपूर ला आली होती. 

तिचे 11 मे रोजी घशातील स्त्राव नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. 
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्ण मुलीची आई यवतमाळ येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. 

दीड महिन्यापासून ती, तिचा भाऊ हे यवतमाळ येथे होते. हे तिघेही एका कारने चंद्रपुरात आले, त्यानंतर चालक कार घेवून परत गेला. अन्य दोघांचे स्त्राव घेतले जाणार आहेत.

यापूर्वी कृष्णनगर एक  इसम पॉझिटिव्ह आढळला होता. त्यांची स्थिती स्थिर असून त्याच्या संपर्कात आलेले एकही जण पॉझिटिव्ह आला नाही. अशातच दुसरा रुग्ण आढळला असून तो जनता शाळा, बिनबा गेट परिसरातील आहे.