चंद्रपुरातील त्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील दोन सदस्यांचे नमुने नेगेटिव्ह :मुलाचा अहवाल येणे बाकी, पत्नी व दोन मुलांचे नमुने दिले होते तपासणीला : corona-test-negative - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरातील त्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील दोन सदस्यांचे नमुने नेगेटिव्ह :मुलाचा अहवाल येणे बाकी, पत्नी व दोन मुलांचे नमुने दिले होते तपासणीला : corona-test-negative

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूरकरांना दिलासादायक वृत्त -
चंद्रपूरमध्ये 2 मे रोजी सापडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या परिवारातील तीन सदस्य - 1 पत्नी व मुलगी  यांचे कोरोना तपासणी अहवाल नेगेटिव्ह आले असून मुलाचा अहवाल येणे बाकी असल्याचे आज सकाळी उशिरा जिल्हा शल्य चिकित्सकांनी अधिकृत स्पष्ट केले आहे. 

चंद्रपुरात  लॉक डाऊन च्या 42 दिवसानंतर सापडलेला पहिला रुग्ण पॉसिटीव्ह निघाल्याने संपूर्ण प्रशाशनासहित जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तेव्हा पासून चंद्ररपूरवासी चिंतेत सापडले होते. या रुग्णाच्या कुटुंबातील लोकांची तातडीने तपासणी करण्यात आली. यातील त्याच्या बायकोचा आणि मुलीचा दोघांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. म्हणजेच या दोघींना कोरोनाची लागण झालेली नाहीये.

 
या रुग्णाच्या मुलाचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.
कोरोनाचा रुग्ण सापडल्याच्या रात्रीच म्हणजे 2 मे 2020च्या रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत यंत्रणेची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी रुग्ण राहात असलेला कृष्ण नगर व लागतच संपूर्ण परिसर सील केला. अंतर्गत रस्तेही रोखण्यात आले. वैद्यकीय कामाव्यतिरिक्त कुणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही असे आदेश देण्यात आले. 

या भागात जंतुनाशक फवारणी केली जात असून घरोघरी जाऊन नागरिकांची विचारणा करण्यासाठी पथकेही कार्यरत करण्यात आली. हा संपूर्ण भाग झोपडपट्टी म्हणून ओळखला जातो. 

अशा भागात लॉकडाऊननंतर सव्वा महिन्यांनी कोरोनाचा रुग्ण सापडणं, हे चकित करणारं आहे. हा रुग्णचौकीदारीचं काम करत असल्याचं कळालं आहे. प्रशासनानं रुग्ण काम करत असलेल्या मूल रोड स्थित शिवाजी नगर येथील गोयल अपार्टमेंट  लोकांना आणि रुग्ण ज्यांच्या थेट संपर्कात आला, अशा दहा लोकांना क्वारंटाईन केलं होतं. यातील चार जण हे त्याच्या कुटुंबातील सदस्य आहे. 


या रुग्णाला सुरुवातीला छातीत दुखणे, ताप वाटत असल्याने खाजगी दवाखाण्यात तपासले असता लक्षणे बघून कोरोना तपासणी करण्यात आली  न्युमोनिया झाला होता असं आधी कळालं होतं. 1 मे रोजी तो उपचारासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये गेला असता त्याचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांची चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते.